मेघनाद बाेधनकर यांना श्रद्धांजली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:08 IST2021-03-22T04:08:14+5:302021-03-22T04:08:14+5:30
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, एस. एन. विनोद, जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख मोईज हक, डॉ. रतिनाथ मिश्रा, मोहन शर्मा, अॅड. ...

मेघनाद बाेधनकर यांना श्रद्धांजली ()
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, एस. एन. विनोद, जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख मोईज हक, डॉ. रतिनाथ मिश्रा, मोहन शर्मा, अॅड. डी. एस. बुचे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते. जाेशी म्हणाले, बाेधनकर हे मतभिन्नता असली तरी दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करणारे व्यक्ती हाेते. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचा प्रवास कष्टाचाच होता. त्यांचे निधन ही मनाला चटका लावणारी घटना आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रकाश दुबे म्हणाले, बोधनकर यांचे पत्रकारिताच्या क्षेत्रात अमूल्य असे योगदान होते. जीवनातील त्यांचा व्यवहार अगदी स्पष्टतेचा होता. त्यांचे विचार अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत, अशी भावना व्यक्त केली. इतर मान्यवरांनीही शाेकसंवेदना व्यक्त केल्या. प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. जोसेफ राव यांनी आभार मानले.