शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज सेक्शनमध्ये ट्रायल रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 21:54 IST

नागपूर छिंदवाडा ब्रॉडगेज मार्गाचे काम भीमालगोंडी पर्यंतचे पूर्ण झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूरवरून इतवारी-खापरखेडा, पाटणसावंगी, सावनेर, केळवद, लोधीखेडा, सौंसर, रामाकोना आणि भीमालगोंडी पर्यंत ‘ट्रायल रन’ शुक्रवारी २८ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. ट्रायल रन झाल्यावर नागरी उड्ड्यण मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी मिळताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

ठळक मुद्देभीमालगोंडीपर्यंत होणार चाचणी : फेब्रुवारीपर्यंत होणार मार्ग वाहतुकीसाठी खुला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर छिंदवाडा ब्रॉडगेज मार्गाचे काम भीमालगोंडी पर्यंतचे पूर्ण झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूरवरून इतवारी-खापरखेडा, पाटणसावंगी, सावनेर, केळवद, लोधीखेडा, सौंसर, रामाकोना आणि भीमालगोंडी पर्यंत ‘ट्रायल रन’ शुक्रवारी २८ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. ट्रायल रन झाल्यावर नागरी उड्ड्यण मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी मिळताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.नागपूर-छिंदवाडा मार्गावर पूर्वी नॅरोगेज रेल्वेगाडी धावत होती. रेल्वे मंत्रालयाने २००७-०८ च्या अर्थसंकल्पात नागपूर-छिंदवाडा या नॅरोगेज ऐवजी ब्रॉडगेज लाईनची घोषणा केली. या प्रकल्पात १४९ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेजचे काम सुरू आहे. यातील नागपूर ते भीमालगोंडी पर्यंतचे ९३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी २८ डिसेंबरला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर-इतवारी-खापरखेडा-पाटणसावंगी-सावनेर-के ळवद-लोधीखेडा-सौंसर-रामाकोना-भीमालगोंडी पर्यंतच्या मार्गाचा ट्रायल रन घेण्यात येणार आहे. भीमालगोंडीपर्यंत लाईट इंजिन, मालगाड्या चालवून या मार्गाची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी दरम्यान सर्व बाबींची पाहणी रेल्वेचे अधिकारी करणार आहेत. ट्रायल रन दरम्यान १०० किलोमीटर प्रतितास वेगाने मालगाडी, लाईट इंजिन चालविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे रुळापासून दूर राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ट्रायल रनमध्ये काही त्रुटी न आढळल्यास नागरी उड्ड्यण मंत्रालयाचे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी हिरवी झेंडी दिल्यावर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार येईल.फेब्रुवारीपर्यंत होणार मार्ग सुरु‘नागपूर ते भीमालगोंडी ९३ किलोमीटरचा ब्रॉडगेज मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. छिंदवाडा ते भंडारकुंड दरम्यान ३४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. केवळ भीमालगोंडी ते भंडारकुंड या सेक्शनमधील १५ ते २० किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे. कामाची प्रगती पाहता फेब्रुवारी महिन्यात नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.’आशुतोष श्रीवास्तव, सिनिअर डीसीएम, दपूम रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर