अंबाझरी उद्यानात रात्रीच्या अंधारात वृक्षताेड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:49+5:302021-04-30T04:10:49+5:30
नागपूर : काेराेनाच्या प्रकाेपामुळे एकीकडे ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागत असल्याची विदारक परिस्थिती आपण पाहताेच आहे. दुसरीकडे नि:शुल्क ...

अंबाझरी उद्यानात रात्रीच्या अंधारात वृक्षताेड ()
नागपूर : काेराेनाच्या प्रकाेपामुळे एकीकडे ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागत असल्याची विदारक परिस्थिती आपण पाहताेच आहे. दुसरीकडे नि:शुल्क ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची कटाई थांबत नाही. अंबाझरी उद्यानात सध्या हेच सत्र सुरू आहे. आठवडाभरापासून सातत्याने रात्रीच्या अंधारात उद्यानातील झाडांची कटाई सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी लाेकमतकडे तक्रार केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून धरमपेठ काॅलेज टी-पाॅइंट ते अमरावती राेडचे काम चालले आहे. शिवाय अंबाझरी उद्यान परिसरातही काही विकासकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कामासाठी वृक्षताेड केली जात आहे आणि दुसरीकडे उद्यान परिसरातही चाललेल्या विकासकामासाठी झाडे ताेडली जात आहेत. विशेष म्हणजे हा सारा प्रकार रात्रीच्या अंधारात केला जात आहे. रात्री झाडे कापून लाकडे ट्रकमध्ये भरून नेली जात असल्याचे पर्यावरणप्रेमी नीलेश नागाेलकर यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले. कापलेली झाडे लाेकांच्या लक्षात येऊ नये म्हणून पालापाचाेळ्याने झाकून ठेवली आहेत. हे अंधारातील कृत्य सात दिवसांपासून सुरू असल्याचे नागाेलकर यांनी सांगितले.
- मनपाचा उद्यान विभाग अनभिज्ञ
महापालिकेच्या उद्यान विभागाने या परिसरातील १००० झाडे कापण्याची परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी अंबाझरीतील वृक्षताेडीबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. या प्रकाराची चाैकशी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र आधीच्या अनुभवावरून या प्रकरणात गंभीरपणे तपासणी हाेणार की नाही, सांगता येत नाही. मात्र अशा भीषण परिस्थितीत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची कटाई करणे निंदनीय असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. अशाने अंबाझरीचा हिरवागच्च परिसर उजाड हाेईल की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.