वागदरा येथे वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST2021-06-01T04:07:55+5:302021-06-01T04:07:55+5:30

गुमगाव : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक जय मल्हार सेना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वागदरा (नवीन ...

Tree planting at Vagdara | वागदरा येथे वृक्षाराेपण

वागदरा येथे वृक्षाराेपण

गुमगाव : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक जय मल्हार सेना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वागदरा (नवीन गुमगाव) येथील राजमाता अहल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंदिराच्या आवारात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अहल्यादेवींच्या पुतळ्यास पूजा व माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवाय, अतिथींनी समाज मंदिराच्या आवारात वृक्षाराेपण केले.

याप्रसंगी बाबा आष्टनकर, अरविंद वाळके, शोभा माहुरे, कंठीराम साबळे, निरंजन चामाटे, बंडू पडवे, रामकृष्णा चतुर, शरद उगे, ज्ञानेश्वर नन्होरे, केशवी भोकरे, संपदा माहुरे, माया घोडे उपस्थित होते. वागदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयाेजित केलेल्या कार्यक्रमात अहल्यादेवींना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रेमनाथ पाटील, उपसरपंच किशोर पडवे, जितू वैद्य, ग्रामसेविका सुहासिनी कोल्हे, मनीषा घोडे, कुसूम खोब्रागडे उपस्थित होते.

Web Title: Tree planting at Vagdara