श्रीकृष्ण हायस्कूलच्या परिसरात वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST2021-08-25T04:11:45+5:302021-08-25T04:11:45+5:30

हिंगणा : तालुक्यातील सावंगी (आसाेला) येथील श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अतिथींसह विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात व ...

Tree planting in the premises of Shrikrishna High School | श्रीकृष्ण हायस्कूलच्या परिसरात वृक्षाराेपण

श्रीकृष्ण हायस्कूलच्या परिसरात वृक्षाराेपण

हिंगणा : तालुक्यातील सावंगी (आसाेला) येथील श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अतिथींसह विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात व माेकळ्या जागेवर वृक्षाराेपण करून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अनिल सोले, राहुल सुद्धलवार, भोलानाथ सहारे, आशिष वांदिले, योगेश बन सावंगी (आसोला)चे सरपंच शेषराव नागमोते, घोडेघाटचे सरपंच शुभम उडाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रावण सोमणकर, केंद्रप्रमुख आदेश तिवारी उपस्थित हाेते. अनिल साेले यांनी वृक्षलागवड व संवर्धन याचे महत्त्व पटवून दिले. ग्रीन अर्थ आर्गनाझेशनच्यावतीने राेपट्यांचा पुरवठा करण्यात आला हाेता. संजय ढुमणे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. देवेंद्र राऊत यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक पुरणदास खोबे यांनी आभार मानले.

Web Title: Tree planting in the premises of Shrikrishna High School