बुद्ध विहार परिसरात वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:01+5:302021-07-12T04:07:01+5:30

रामटेक : कल्याणमित्र बुद्ध विहार समिती शीतलवाडी (ता. रामटेक), आकाशझेप फाऊंडेशन रामटेक व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा रामटेक यांच्या ...

Tree planting in Buddha Vihar area | बुद्ध विहार परिसरात वृक्षाराेपण

बुद्ध विहार परिसरात वृक्षाराेपण

रामटेक : कल्याणमित्र बुद्ध विहार समिती शीतलवाडी (ता. रामटेक), आकाशझेप फाऊंडेशन रामटेक व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने शीतलवाडी येथील कल्याणममित्र बुद्ध विहारात रविवारी (दि. ११) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी बुद्ध विहाराच्या आवारात वृक्षाराेपण करून त्या राेपट्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष डॉ. हेमंत वाघमारे, सचिव विक्रांत नंदेश्वर, आकाशझेपच्या आम्ही भारतीय अभियानाचे संस्थापक व संयोजक साक्षोधन कडबे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अर्चना मेश्राम, शुभा थूलकर व दीपा चव्हाण उपस्थित होते. अतिथींनी पर्यावरण, मानवी जीवन व जैवविविधता यातील झाडांचे महत्त्व सजावून सांगितले. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच बुद्धवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रुस्तम मोटघरे यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. यशस्वितेसाठी चिंधू बोरकर, चंद्रभान गजभिये, रमा देशभ्रतार, मेंढे यांनी सहकार्य केले.

Web Title: Tree planting in Buddha Vihar area