शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर ३९ कोटींचे वृक्षारोपण, मग हिरवळ गेली तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:22 IST

Nagpur : ड्रिप इरिगेशन सिस्टीममधून पाण्याचा थेंबही नाही

वसीम कुरैशी लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर कडक उन्हात कुण्या वाहनचालकाला एखाद्या झाडाच्या सावलीत थांबण्याची इच्छा झाल्यास ती गैर ठरेल. एमएसआरडीसीच्या नागपूर कार्यालयाच्या क्षेत्रात ते दिसणारच नाही. नागपूरच्या कोतेवाडापासून सेलडोहपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोपटे दिसत नाही. विशेष म्हणजे, या अंतरावर वृक्षारोपणासाठी ३९ कोटींची तरतूद 66 करण्यात आली होती. आता मात्र हिरवळच राहिलेली नाही.

विदर्भाच्या भागातील समृद्धी महामार्गावरची ही दुर्दशा निराशाजनक आहे. वृक्षारोपणातही मोठी गडबड झाल्याची शंका आहे. सेलडोह गावापर्यंत ३०.१४ किलोमीटरसाठी रोपे लावण्यासाठी ३७.६६ कोटींचे टेंडर होते. तर, त्यासाठी ३९.२२ कोटींची रक्कम अलाट करण्यात आली. २०२३ पासून हे वृक्षारोपण दोन वर्षांत करण्याचे ठरले होते. खडकी बांधातून पाणी घेऊन ड्रिप इरिगेशनची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, रस्त्याच्या बाजूच्या रोपट्यांची स्थिती बघितली तर दीड दोन फुटांचे अनेक छोटे झाडं वाळल्याचे दिसते. ड्रिपमधून पाणीसुद्धा टपकताना दिसत नाही. त्यामुळे रोपट्यांची देखभाल करण्यात हलगर्जीपणा झाल्याचा अंदाज येतो. कंत्राटानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला ४३ हजार, ९० झाडे लावायची होती तर मधल्या भागात ४२ हजार ६५४ झाडे लावायची होती. 

कुणी बांबू दाखवणार का ?या वृक्षारोपणात बांबू, क्रीपर आदी लावण्याचे ठरले होते. मात्र, वाहन चालविताना त्याचे कुठेही नामोनिशाण दिसत नाही. काही ठिकाणी मोजक्या झाडांची उंची दोन-तीन फूट दिसते. सूत्रांच्या माहितीनुसार, या रोपट्यांच्या देखभालीची जबाबदारी पाच वर्षांची आहे. मात्र, ज्या उन्हाळ्यात देखभालीची जास्त गरज असते, त्याच उन्हाळ्यात मेंटेनन्स होताना दिसत नाही. हे काम एमएसआरडीसी नागपूर कार्यालयाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, मॅनेजर आणि सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर / पीडी यांच्या निगराणीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

"या प्रकरणात यापूर्वीच कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. चुकीचे काम सहन केले जाणार नाही. कंत्राटात ठरल्याप्रमाणेच काम व्हायला पाहिजे. याबाबत मुख्य अभियंत्यांकडे विचारपूस करू, त्यानंतर आवश्यक पावलं उचलली जातील."- अनिल गायकवाड, व्हीसीएमडी, एमएसआरडीसी 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूर