ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, १ ठार

By Admin | Updated: June 14, 2017 16:51 IST2017-06-14T16:51:33+5:302017-06-14T16:51:33+5:30

ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण ठार झाल्याची घटना घडली.

Travels bicycle, 1 killed | ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, १ ठार

ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, १ ठार

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील श्यामनगर येथे बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण ठार झाल्याची घटना घडली.
ट्रॅव्हल्सची गाडी मूलचेराकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक बसली. यात दुचाकीवर मागे बसलेला रमेश माधव झुरे (४०) या इसमाचे उपचारादरम्यान निधन झाले. ट्रॅव्हल्सचा वाहनचालक रोशन वाघमारे याने घटनास्थळावरून पळ काढला मात्र पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Travels bicycle, 1 killed