शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून थांबणार इतवारी-नागभीड नॅरोगेजचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:46 IST

इतवारी-नागभीड नॅरोगेज रेल्वेचा प्रवास रविवारपासून कायमचा थांबणार आहे. नागपूर विभागातील एकमेव नॅरोगेज रेल्वे बंद होणार असल्यामुळे यापुढे प्रवाशांसोबत नॅरोगेजच्या केवळ आठवणी उरणार आहेत.

ठळक मुद्देअखेरची फेरी : नॅरोगेज लाईनच्या उरणार फक्त आठवणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इतवारी-नागभीड नॅरोगेज रेल्वेचा प्रवास रविवारपासून कायमचा थांबणार आहे. नागपूर विभागातील एकमेव नॅरोगेज रेल्वे बंद होणार असल्यामुळे यापुढे प्रवाशांसोबत नॅरोगेजच्या केवळ आठवणी उरणार आहेत. त्यानंतर १ डिसेंबरपासून नागभीड ब्रॉडगेज रेल्वेच्या कामाला सुरुवात होणार आहे.भारतीय रेल्वेत नॅरोगेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये होत आहे. नागपूर विभागात केवळ इतवारी-नागभीड हा एकमेव मार्ग शिल्लक होता. या मार्गावरील नॅरोगेज गाडीही बंद होणार आहे. नॅरोगेजच्या प्रवासाला उशीर लागत असला तरी या प्रवासाचा आनंद वेगळाच होता. यापुढे हा आनंद प्रवाशांना घेता येणार नाही. या मार्गावर १९१३ पासून नॅरोगेज रेल्वेगाडी धावते. या मार्गावरील वाहतुकीमुळे चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी १९९७ पासून प्रयत्न सुरू झाले. १९९७ साली या मार्गासाठी पहिल्यांदा सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी यासाठी १४२ कोटी रुपये खर्च येणार होता. २००९ साली जुने सर्वेक्षण अपडेट करण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा सर्वेक्षण झाले. त्यानंतर २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाची घोषणा करण्यात आली आणि त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूदही तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी केली होती. १०६ किमी मार्गाच्या विस्तारासाठी ९२२ कोटी रुपये खर्च येणार आहे. यात राज्य सरकार ५० टक्के वाटा उचलणार आहे.या गाड्या होणार बंदनागपूर-नागभीड या मार्गाचे तीन टप्प्यात काम होणार असून, पहिल्या टप्प्यात नागभीड-भिवापूर, दुसऱ्या टप्प्यात भिवापूर-उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड-नागपूर असे काम विद्युतीकरणासह होणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक ५८८४३/५८८४४ इतवारी-नागभीड-इतवारी, ५८८४५/५८८४६ इतवारी-नागभीड-इतवारी, ५८८४७/५८८४८ इतवारी-नागभीड-इतवारी आणि ५८८७७/५८८७८ इतवारी-नागभीड-इतवारी या गाड्या कायमच्या बंद होणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर