शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

नागपुरात ट्रॅव्हल्सचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:27 PM

उन्हाळ्यात रेल्वेगाड्या फुल्ल होऊन प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपले दर ३०० ते ४०० रुपये वाढविले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी लूट होत असून त्यांना नाईलाजास्तव अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना फटका : गर्दीच्या दिवशी १२ टक्के अधिक दर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात रेल्वेगाड्या फुल्ल होऊन प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपले दर ३०० ते ४०० रुपये वाढविले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी लूट होत असून त्यांना नाईलाजास्तव अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.नागपुरातून काही शहरात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. यात नागपूर-पुणे एसी स्लिपरसाठी १४५०- १७०० रुपये, नॉन एसीसाठी एक हजार ते ११०० रुपये दर आहेत. नाशिकसाठी एसी स्लिपर १ हजार ते १३२७ रुपये आकारण्यात येत आहेत. हैदराबादसाठी १३०० ते १५३० रुपये, तर औरंगाबादसाठी एसी स्लिपर ८५० ते ९०० रुपये आणि नॉन एसीसाठी ७५० रुपये आकारण्यात येत आहेत. यात काही सिट बुक झाल्यानंतर अचानक तिकिटाची रक्कम आणखी जास्तच वाढविण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु नाईलाजास्तव प्रवासी अधिकचे पैसे देऊन प्रवास करीत असल्याची स्थिती आहे. गर्दीच्या दिवशी हे दर १२ टक्के अधिक आकारण्यात येत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सने वाढविलेल्या दराबाबत विचारणा केली असता डिझेलचे वाढलेले दर आणि टोल टॅक्स यामुळे दर वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अजून १५ दिवस हे दर असेच कायम राहणार असल्याची माहिती ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिली.डिझेलचे भाव वाढल्यामुळे दरवाढ‘डिझेलचे भाव वाढल्यामुळे ट्रॅव्हल्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बऱ्याच ठिकाणी टोल टॅक्स वाढला आहे. वाढलेल्या खर्चामुळे ट्रॅव्हल्सचे दर वाढविण्याचा निर्णय ट्रॅव्हल्स असोसिएशनने घेतला आहे.’महेंद्र लुले, कोषाध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन नागपूर

 

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकInflationमहागाई