गॅरेजमध्ये दरोड्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 18, 2015 03:22 IST2015-11-18T03:22:13+5:302015-11-18T03:22:13+5:30
दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर कोतवालीतील दुचाकीच्या गॅरेजमध्ये दरोडा घालण्याचा प्रयत्न केला.

गॅरेजमध्ये दरोड्याचा प्रयत्न
चौकीदाराला मारहाण : रक्कमही लुटली
नागपूर : दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर कोतवालीतील दुचाकीच्या गॅरेजमध्ये दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. चौकीदाराला मारहाण करून त्याच्या जवळचे १४०० रुपये हिसकावून नेले. एका वाहनाचीही तोडफोड केली. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.
गंगाबाई घाट मार्गावर एका दुचाकी कंपनीचे वर्क्स शॉप (गॅरेज) आहे. दामोदर लक्ष्मणराव गुजरकर (वय ६४) तेथे चौकीदारी करतात. सोमवारी मध्यरात्री ते गॅरेजसमोर कर्तव्यावर असताना दोन आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून आतमधील वाहनांची चावी मागितली. गुजरकर यांनी नकार दिल्यामुळे दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळचे १४०० रुपये हिसकावून घेतले आणि समोर उभ्या असलेल्या वाहनाचे काच फोडून पळ काढला. गुजरकर यांना दोन दरोडेखोरांनी लुटले. तर काही अंतरावर त्यांचे पुन्हा काही साथीदार अंधारात होते, अशी चर्चा आहे. गुजरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.