गांजा विक्रेता पाेलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:25+5:302021-06-27T04:07:25+5:30

कळमेश्वर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमेश्वर शहरात केलेल्या कारवाईमध्ये गांजा विक्रेत्यास अटक करून त्याच्याकडून ८९५ ग्राम गांजा जप्त ...

In the trap of cannabis sellers Paelis | गांजा विक्रेता पाेलिसांच्या जाळ्यात

गांजा विक्रेता पाेलिसांच्या जाळ्यात

कळमेश्वर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमेश्वर शहरात केलेल्या कारवाईमध्ये गांजा विक्रेत्यास अटक करून त्याच्याकडून ८९५ ग्राम गांजा जप्त केला. त्या गांजाची किंमत नऊ हजार रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई शुक्रवारी (दि. २५) करण्यात आली.

विजय दिगांबर महाजन (४५, रा. रेल्वेस्थानक राेड, कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कळमेश्वर परिसरात गस्तीवर असताना त्यांना विजय गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने थेट त्याच्या घरी धाड टाकून झडती घेतली. त्याच्याकडे ८९५ ग्राम गांजा आढळून येताच गांजा जप्त करून त्याला अटक केली.

या गांजाची किंमत नऊ हजार रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षकद्वय राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, सहायक फाैजदार जयप्रकाश शर्मा, दिनेश आधापुरे, राजेंद्र रेवतकर, नम्रता बघेल, अमाेल वाघ, महेश बिसने, अमाेल कुथे यांच्या पथकाने केली.

Web Title: In the trap of cannabis sellers Paelis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.