लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेला लवकरच सुरुवात होणार असल्याने सजावटीचे कार्य वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मिंग नागपूर आता खऱ्या अर्थाने दृष्टिपथास यायला लागले आहे. रिच-१ कॉरिडोरअंतर्गत वर्धा मार्गावरील खापरी तेसीताबर्डीपर्यंत मेट्रोमार्गाशी संबंधित पिलर, व्हायाडक्ट, ट्रॅक इत्यादी महत्त्वाचे कार्य पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर रस्त्याचे बांधकाम आणि सौंदर्यीकरणास सुरुवात झाली आहे. मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत संपूर्ण कार्य करण्यात येत आहे.उल्लेखनीय आहे की, रस्त्यावरून प्रवास करणाºया नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रिच-१ मार्गावरील रस्त्यांवर होत असलेले कार्य पूर्ण होताच त्या ठिकाणचे बॅरिकेडस् काढण्यात येत आहे. जेणेकरून वाहनचालकांना पूर्ववत मोकळा मार्ग उपलब्ध होऊ शकेल. बॅरिकेडस् हटविताच रस्त्यावरची संपूर्ण जागा नीटनेटकी करण्यात येते. फूटपाथ तयार केले जात आहे. तसेच परिसरातील सौंदर्यीकरण वाढविण्यासाठी उपलब्ध जागेवर झाडे लावण्यात येत आहे. रंगरंगोटीचे कार्य युद्धस्तरावर पूर्ण केले जात आहे.व्हायाडक्टवर दोन्ही बाजूने स्टील रेलिंग लावण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या रेलिंगवर ‘माझी मेट्रो’ नाव लिहिण्यात आले आहे. स्टील रेलिंगमुळे व्हायाडक्ट मेट्रोमार्ग दिसायलाही आकर्षक दिसत आहे. नागपूरकरांना माझी मेट्रोविषयी नेहमी अभिमान वाटावा त्यादिशेने महामेट्रो कार्य करीत आहे. कार्यादरम्यान नागपूरकरांचे सहकार्य मिळत आहे.
ट्रान्स्फॉर्मिंग नागपूर; मोकळ्या जागेवर झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 10:46 IST
शहरात नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेला लवकरच सुरुवात होणार असल्याने सजावटीचे कार्य वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मिंग नागपूर आता खऱ्या अर्थाने दृष्टिपथास यायला लागले आहे.
ट्रान्स्फॉर्मिंग नागपूर; मोकळ्या जागेवर झाडांची लागवड
ठळक मुद्देमेट्रोमार्गाचे सौंदर्यीकरण पर्यावरणाचे संरक्षण