परिवहनचे बजेट २५४ कोटींचे

By Admin | Updated: June 4, 2017 01:41 IST2017-06-04T01:41:01+5:302017-06-04T01:41:01+5:30

महापालिकेच्या परिवहन विभागाने परिवहन समितीकडे शनिवारी तब्बल ४५४.५६ कोटी रुपयांचे ‘बिग बजेट’ सादर केले.

Transport budget of 254 crore | परिवहनचे बजेट २५४ कोटींचे

परिवहनचे बजेट २५४ कोटींचे

महापालिका : सभापती कुकडेंकडे ४८ तासात सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाने परिवहन समितीकडे शनिवारी तब्बल ४५४.५६ कोटी रुपयांचे ‘बिग बजेट’ सादर केले. परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी २०१७-१८ चे परिवहन बजेट सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सोपविले. या बजेटमध्ये २५४.५६ कोटी रुपये उत्पन्न तर २५४.४५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. परिवहन समितीने एकमताने या बजेटला मंजुरी दिली.
परिवहन विभागाचे बजेट सादर होण्यास तीन महिन्यांचा विलंब झाला असला तरी, सभापती बंटी कुकडे यांनी पदभार स्वीकारल्याच्या ४८ तासात बजेट सादर करण्यात आले आहे. समितीने अभ्यास न करताच या बजेटला मंजुरीही दिली. एवढेच नव्हे तर स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांना त्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये जाऊन बजेटची प्रत सोपविण्यात आली. या बजेटचा आपण अभ्यास करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
परिवहन समितीच्या बैठकीत अभिरुची राजगिरे, अर्चना पाठक, कल्पना कुंभलकर, वैशाली रोहणकर, उज्ज्वला शर्मा, निगम सचिव हरीश दुबे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, शिवाजीराव जगताप आदी उपस्थित होते. मुंबई महापालिका कायदा २०१२ मध्ये महापालिकेत लागू करण्यात आला. बंडू राऊत व बाल्या बोरकर यांच्या कार्यकाळात परिवहन समितीचे बजेट सादर होऊ शकले नाही. पूर्वी १०० कोटींचे बजेट सादर करणेच कठीण होते. मात्र, बंटी कुकडे यांनी पदभार स्वीकारल्याच्या ४८ तासातच बिग बजेट सादर करून आपली बसने नागरिकांच्या अपेक्षा वाढविल्या आहेत.
परिवहन समिती सभापतीला या बजेटमध्ये बदल करण्याचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. परिवहन समितीचे बजेट स्थायी समितीच्या बजेटमध्ये समाविष्ट करावे लागणार आहे. बैठकीत बसची स्थिती, गती, फेऱ्या आदींची माहिती सभापती कुकडे यांनी घेतली. चिल्लरची समस्या सोडविण्यासाठी कंडक्टरकडे १०० रुपयांची चिल्लर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Transport budget of 254 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.