संक्रमण इथेले संपत नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:35+5:302021-04-04T04:08:35+5:30
सावनेर/काटोल/हिंगणा/कळमेश्वर/नरखेड/उमरेड/कुही/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी १३ तालुक्यात ११२६ रुग्णांची नोंद झाली तर १७ ...

संक्रमण इथेले संपत नाही...
सावनेर/काटोल/हिंगणा/कळमेश्वर/नरखेड/उमरेड/कुही/रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी १३ तालुक्यात ११२६ रुग्णांची नोंद झाली तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे वाढते उल्लंघन हेच ग्रामीण भागातील संक्रमणाचे मुख्य कारण ठरत आहे.
सावनेर तालुक्यात ४०६ रुग्णांची भर पडली. यात शहरातील १४८ तर ग्रामीण भागातील २५८ नागरिकांचा समावेश आहे. तालुक्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यातील पाटणसावंगी आरोग्य केंद्रांतर्गत ५, चिचोली (२) तर बडेगाव केंद्रांतर्गत एका रुग्णाचा मृत्यू झाला. हिंगणा तालुक्यात पुन्हा ८६ रुग्णांची भर पडली.
नरखेड तालुक्यात ५६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ६ तर ग्रामीण भागातील ५० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२४ तर, शहरातील ५१ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात जलालखेडा आरोग्य केंद्रांतर्गत २०, सावरगाव (११), मोवाड (१४) तर मेंढला येथे ५ रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात ६१ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मनसर येथे १३, शीतलवाडी (७), पथरई (४), देवलापार, नगरधन व परसोडा येथे प्रत्येकी ३, दुलारा (२) तर बुद्धटोला, दाहोदा, डोंगरी, डोंगरताल, खैरी बिजेवाडा, महादुला, मनसर माईन, मौदी, पंचाळा, पटगोवरी, शिरपूर व वाहिटोला येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १९३८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १२८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, ५१ जणांचा मृत्यू झाला. उमरेड तालुक्यात ३९ रुग्णांची भर पडली. यात शहरातील २८ तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यात ६० रुग्णाची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात २४ तर, ग्रामीण भागात ३६ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागात तिडंगी येथे ६, तेलकामठी (५), झुनकी (५), धापेवाडा, बोरगाव बु. येथे तीन, खैरी हरजी, उबाळी, वाढोणा येथे प्रत्येकी दोन तर उपरवाही, मोहपा, सोनोली, तिष्टी बु., लोणारा, लिंगा, सावली मावली, तोंडाखैरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात १५१ बाधित
कुही तालुक्यात शनिवारी १५१ रुग्णांची नोंद झाली. यासोबतच ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रावर ७६५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात मांढळ येथे १०२, वेलतूर (३३), तितूर (६), कुही व साळवा येथे प्रत्येकी पाच रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १२९९ इतकी झाली आहे.
काटोलची स्थिती चिंताजनक
काटोल तालुक्यात शनिवारी ८७ रुग्णांची नोंद झाली. यात काटोल न.प. क्षेत्रातील ३४ तर ग्रामीण भागातील ५३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कोंढाळी येथे ११, चारगाव (६), मेंढेपठार (बाजार), चिचाळा येथे प्रत्येकी चार, पारडसिंगा, इसापूर येथे प्रत्येकी तीन, पंचधार, कचारीसावंगा, डोरली (भिंगारे), कलंबा येथे प्रत्येकी दोन तर मेटपांजरा, खुटांबा, लाखोळी, धुरखेडा, मसाळा, घुबडी, नायगाव, वडविहिरा, बोरी, मसली, पानवाडी, गोन्ही, सिर्सावाडी, झिल्पा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.