पोलीस अधिका-यांच्या बदल्या
By Admin | Updated: January 9, 2017 21:44 IST2017-01-09T21:44:55+5:302017-01-09T21:44:55+5:30
नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक एस. आर. शेलार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या बदलीसोबतच नागपूर ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक

पोलीस अधिका-यांच्या बदल्या
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 09 - नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक एस. आर. शेलार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या बदलीसोबतच नागपूर ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून शैलेष बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एसपी आणि डीआयजी दर्जाच्या पाच अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी सायंकाळी गृहविभागाने जारी केले. त्यात महत्वपूर्ण मानल्या जाणा-या नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख (आयजी, एएनओ) शेलार यांचाही समावेश आहे. आतापर्यंत हे पद गडचिरोली-गोंदीया परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांच्याकडे होते. शेलार अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.
दुसरी महत्वाची नियुक्ती नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची आहे. येथील अनंत रोकडे यांना राज्य गुन्हे अण्वेषण विभागात (पुणे) अधीक्षक म्हणून स्थानांतरीत करून त्यांच्या जागी लोहमार्ग पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. शहर पोलीस आयुक्तानंतर मानाचे पद म्हणून पोलीस दलात नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पदाकडे बघितले जाते. बलकवडे यांनी नागपूर पोलीस आयुक्तालयात परिमंडळ १ चे उपायुक्त, उपायुक्त प्रशासन अशा जबाबदा-या सांभाळल्या आहेत. चांगले काम असूनही बलकवडे यांना साईडलाईन करण्यात आले होते. दरम्यान, या नियुक्तीमुळे त्यांना न्याय मिळाल्याची भावना स्थानिक पोलीस अधिका-यांमधून व्यक्त होत आहे. बलकवडे यांच्या रिक्त पदावर साहेबराव पाटील यांची वर्णी लावण्यात आली. पाटीलही अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.