मनपाचे अतिरिक्त आयुक्त मीना यांची बदली; अजय गुल्हाने यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 22:11 IST2022-10-12T22:10:39+5:302022-10-12T22:11:13+5:30
Nagpur News नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांची ठाणे येथे आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे; तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हानेे यांना मीना यांच्या जागेवर पाठवण्यात आले आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त मीना यांची बदली; अजय गुल्हाने यांची वर्णी
नागपूर : नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांची ठाणे येथे आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे; तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हानेे यांना मीना यांच्या जागेवर पाठवण्यात आले आहे.
राज्य शासनाने बुधवारी सायंकाळी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. यात मीना, गुल्हाणे यांच्यासह पूर्व विदर्भातील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर येथील वनामतीच्या संचालक म्हणून मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे; तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.