कोरोनाचा प्रकोप असतानाही रेल्वेगाड्या फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:29 AM2020-09-17T01:29:54+5:302020-09-17T01:31:06+5:30

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास नागरिक प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असून आणखी महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

The trains were full despite the Corona outbreak | कोरोनाचा प्रकोप असतानाही रेल्वेगाड्या फुल्ल

कोरोनाचा प्रकोप असतानाही रेल्वेगाड्या फुल्ल

Next
ठळक मुद्दे वेटिंगची स्थिती : हावडा-मुंबई रेल्वेगाडीत अधिक वेटिंग

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास नागरिक प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असून आणखी महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने रेल्वे बोर्डाने वाहतूक सुरू केली. सुरुवातीला विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. यातील काही गाड्या नागपूरमार्गे धावत होत्या. यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली. कोरोनामुळे नागरिक अत्यावश्यक असल्यास प्रवास करीत आहेत. तरीसुद्धा सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या एसी फर्स्टमध्ये १७ सप्टेबरला वेटिंग १७, सेकंड एसीत वेटिंग २९, थर्ड एसीत वेटिंग ५० आणि स्लिपरमध्ये १९९ वेटिंग आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडात १९ सप्टेंबरला फर्र्स्ट एसीत वेटिंग ४, सेकंड एसीत वेटिंग २१, थर्ड एसीत वेटिंग २२, स्लिपरमध्ये वेटिंग ७९ आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८३४ हावडा-अहमदाबादमध्ये १९ सप्टेंबर रोजी सेकंड एसीत वेटिंग ९, थर्ड एसीत वेटिंग २८, स्लिपरमध्ये वेटिंग १०२ सुरू आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८३३ अहमदाबाद-हावडामध्ये २१ सप्टेंबरला सेकंड एसीत वेटिंग १३, थर्ड एसीत वेटिंग २२, स्लिपरमध्ये वेटिंग ५७ आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२७२३ हैदराबाद-नवी दिल्लीमध्ये फर्स्ट एसीत वेटिंग २, सेकंड एसीत वेटिंग २, थर्ड एसीत वेटिंग २ आणि स्लिपरमध्ये वेटिंग ८ सुरु आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२२९५ बंगळुर-पटनामध्ये सेकंड एसीत वेटिंग ३, थर्ड एसीत वेटिंग ११, स्लिपरमध्ये वेटिंग २४ आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०२७९१ सिकंदराबाद-दानापूरमध्ये सेकंड एसीत वेटिंग ६, थर्ड एसीत वेटिंग ५, स्लिपरमध्ये वेटिंग २४ सुरु आहे. नागपूर मार्गे चारही दिशांना धावणाऱ्या रेल्वेगाड्यात पुढील महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कन्फर्र्म तिकीटधारकांनाच प्रवेश
रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असली तरी कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेपर्यंत तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना प्रवासाचा बेत रद्द करावा लागत आहे.

रेल्वेगाड्यांना चांगला प्रतिसाद
रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. त्यानुसार नागपूरमार्गे जवळपास ३२ रेल्वेगाड्या धावत आहेत. या रेल्वेगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे.
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

Web Title: The trains were full despite the Corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.