शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ होताहेत ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:14 IST

मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईकडे कुठलीही रेल्वे सोडण्यात आली नाही. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रवाशांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देकाही मार्गावर अजूनही ट्रेन रद्द : प्रवाशांकडून होताहेत विचारणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईकडे कुठलीही रेल्वे सोडण्यात आली नाही. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रवाशांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडले होते. रॅक उपलब्ध होत नसल्याने ट्रेनवर अजूनही प्रभाव आहे. पुणे-मुंबई व भुसावळ-इटारसी मार्ग अजूनही प्रभावित आहे. त्यामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी ११०४६ धनबाद-कोल्हापूर दीक्षाभूमी एक्स्प्रेस, ११२०१ एलटीटी-अजनी, १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, १२२६२ हावडा-मुंबई दुरांतो, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी, १७६०९ पटना-पूर्णा एक्स्प्रेस, २२८४८ एलटीटी-विशाखापट्टणम, २२८६६ पुरी-एलटीटी एक्सप्रेस, १२१४६ पुरी-एलटीटी एक्स्प्रेस, १२१०१ एलटीटी-हावडा एक्सप्रेस, १९३१७ इंदूर-पुरी हमसफर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तर १९३१८ पुरी-इंदूर हमसफर एक्स्प्रेस (०७.०८.१९ ला), १२८७९ एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस (०७.०८.१९ ला) व २२८६५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस ८ आॅगस्टला रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबाबत रेल्वे प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नागपूर व वर्धा स्टेशनवर रिफंडसाठी विशेष बूथ व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना माहिती देण्यासाठी विशेष सहायता बूथ स्थापित करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांकडून रेल्वे स्टेशनवर विचारपूस सुरू आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरMumbaiमुंबई