स्वयंरोजगांरासाठी महिलांना ‘जनसंग्राम’तर्फे प्रशिक्षण

By Admin | Updated: August 13, 2014 00:46 IST2014-08-13T00:46:23+5:302014-08-13T00:46:23+5:30

जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील विविध भागातील महिला बचत गटांना नि:शुल्क स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिला

Training for women 'Jang Sangram' for self-employment | स्वयंरोजगांरासाठी महिलांना ‘जनसंग्राम’तर्फे प्रशिक्षण

स्वयंरोजगांरासाठी महिलांना ‘जनसंग्राम’तर्फे प्रशिक्षण

परिणय फुके यांचा पुढाकार : बचत गट लागले कामाला
नागपूर : जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील विविध भागातील महिला बचत गटांना नि:शुल्क स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर होतील व घरबसल्या लघुउद्योग सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील, असा विश्वास डॉ. फुके यांनी यावेळी व्यक्त केला.
तेलंगखेडी, रामनगर, दाभा, वाडी टेकडी, मानकापूर या परिसरातील महिला बचत गटांना कागदी पिशवी, लिफाफे, फाईल्स, कागदी फुल इत्यादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अंबाझरी टेकडी, झिंगाबाई टाकळी, पांढराबोडी या परिसरातील महिला बचत गटांना मेणबत्ती बनविणे व मेणा(व्हॅक्स)पासून बाहुल्या, झाड, फुले, दिवाळी मेणबत्ती, ख्रिसमस मेण ट्री तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व प्रत्यक्षात वस्तू तयार केल्या. आजवर सुमारे १०० महिला बचत गटांच्या एक हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महिला बचत गटांनी तयार केलेले उत्पादन किंवा मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जनसंग्राम फाऊंडेशन व ग्राम मार्ट इंडिया लि़ मुंबई यांनी स्वीकारली. महिला फक्त माल तयार करतील. तो विकण्याची जबाबदारी आमची राहील, असेही डॉ. फुके यांनी प्रशिक्षणादरम्यान सांगितले.
ज्या महिलांना किंवा महिला बचत गटांना या वस्तू बघून त्याद्वारे प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी जनसंग्राम फाऊंडेशन, अंबाझरी, हिलटॉप, येथे संपर्क साधावा़, असे आवाहनही डॉ. फुके यांनी केले.
या महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्याचे काम प्रशिक्षक संगीता जेठे, मिटकॉनचे प्रबंघक ज्ञानेश्वर चौधरी, जयदीप दास हे करीत आहेत. प्रशिक्षणात कला, कौशल्य, संवाद, बाजारपेठ, बाजारमूल्य, संभाषण कौशल्य आदींची माहिती दिली जाते. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना एका छोटेखानी समारंभात डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले़. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन डोये, आशिष मनकवडे, मंगेश तागडे, शेखर मनकवडे आदींनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)

Web Title: Training for women 'Jang Sangram' for self-employment