ग्राम बाल संरक्षक समिती पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST2021-03-25T04:09:03+5:302021-03-25T04:09:03+5:30
महिला व बालकांवर होणारे अत्याचार, त्याचे वाढते प्रमाण बघता शासन निर्णयानुसार प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात ...

ग्राम बाल संरक्षक समिती पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
महिला व बालकांवर होणारे अत्याचार, त्याचे वाढते प्रमाण बघता शासन निर्णयानुसार प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच असून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सामाजिक संस्था प्रतिनिधी, स्थानिक पत्रकार, शिक्षक, आरोग्यसेवक तसेच १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेला एक बालक व बालिका सदस्य आहेत. सदस्य सचिव या अंगणवाडी सेविका आहेत.
बालविवाह कायदा, बालकामगार कायदा व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२, काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ तसेच मुलांचे अधिकार व संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक महिन्याला सभा घेऊन बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध व्हावा व वरिष्ठांना माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला कुहीचे तहसीलदार बाबाराव तीनघसे, पंचायत समितीचे उपसभापती वामन श्रीरामे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती गजभिये, बाल संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना हटवार, स्नेहा सोनटक्के, अनघा मोघे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी तकीत, संरक्षण अधिकारी युवराज वर्मा व अंगणवाडी सेविका तसेच तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.