तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:09+5:302021-06-02T04:08:09+5:30

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रभावी वैद्यकीय उपचारासाठी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार ...

Training of health workers for third wave preparedness | तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रभावी वैद्यकीय उपचारासाठी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ७ ते १८ जून या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. संभाव्य लाटेदरम्यान मुलांना असलेला धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी या प्रशिक्षणाची आखणी करण्याचे निर्देश दिले आहे.

प्रशिक्षणात नागपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, असे सुमारे हजार जण असतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, लता मंगेशकर हॉस्पिटल या तीन रुग्णालयांत हे प्रशिक्षण होईल.

Web Title: Training of health workers for third wave preparedness