अजनीला थांबणार रेल्वेगाड्या
By Admin | Updated: October 3, 2014 02:54 IST2014-10-03T02:54:15+5:302014-10-03T02:54:15+5:30
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना अजनी रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

अजनीला थांबणार रेल्वेगाड्या
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना अजनी रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ३ आॅक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी ११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, १२८१० हावडा-मुंबई मेल, १२९०५ हापा-हावडा एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, १२१५१ कुर्ला-हावडा एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२८४४ अहमदाबाद-पुरी जनसेवा एक्स्प्रेस, ११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस, ११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस अजनी रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. ४ आॅक्टोबरला १२८१२ हतिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, ११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस, १२४०६ निजामुद्दीन-भुसावळ एक्स्प्रेस, ११४५४ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, १२८१० हावडा-मुंबई मेल, ११४०३ नागपूर-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, १२१५२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२८५० पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस, १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, १२९४९ पोरबंदर-संत्रागाछी एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्स्प्रेस, ११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस अजनी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात येणार आहे.
प्रवाशांनी योग्य दराचे तिकीट घेऊन प्रवास करावा तसेच चालत्या गाडीत चढू वा उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
याशिवाय गाडीच्या वर २५ केव्हीचा इलेक्ट्रीक केबल असल्यामुळे छतावर बसून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)