रेल्वे तिकीट दलालास अटक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:39+5:302021-03-15T04:07:39+5:30

नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून त्याच्याकडून ७३ हजार २१९ रुपये किमतीच्या ४४ ...

Train ticket broker arrested () | रेल्वे तिकीट दलालास अटक ()

रेल्वे तिकीट दलालास अटक ()

नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून त्याच्याकडून ७३ हजार २१९ रुपये किमतीच्या ४४ ई-तिकीट जप्त करण्यात आल्या आहेत.

रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक सुधार मिश्रा, निरीक्षक आर.एल. मिणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान आरक्षक मनोज काकड, अनिस खान, नितेश ठमके यांनी निमखेडा येथील लक्ष्मी मोबाईल शॉपी या दुकानावर धाड टाकली. दुकानात बसलेल्या व्यक्तीने आपले नाव आशिष दशरथ महादुले (३०, रा. वॉर्ड नं. ३, निमखेडा, ता. मोहदा) असे सांगितले. आपण टूर पॅकेज, मनी ट्रान्सफर, एअर तिकीट बूकिंग, बस बूकिंग, रेल्वे ई-तिकीटचे काम करीत असल्याची माहिती त्याने दिली. ई तिकिटांच्या आरक्षणाबाबत त्याची चौकशी केली असता, ११ पर्सनल युझर आयडीच्या माध्यमातून तो ई-तिकिटांचे बूकिंग करीत असल्याचे स्पष्ट झाले. तो गरजू प्रवाशांकडून १०० ते २०० रुपये अधिक घेऊन ई-तिकीट पुरवितो. त्याच्या कडून ७३२१९ रुपये किमतीच्या ४४ ई-तिकीट, ३० हजारांचा लॅपटॉप, लॅपटॉप चार्जर, सहा हजारांचा मोबाईल असा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

................

Web Title: Train ticket broker arrested ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.