शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बची सूचना मिळाल्याने नागपुरात रेल्वेगाड्यांची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 20:50 IST

देशभरात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची माहिती आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची श्वानपथकासह कसून तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरपीएफ, लोहमार्ग पोलिसांना सतर्कतेचा इशारा : सीसीटीव्ही कक्षातून रेल्वेस्थानकावर नजर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशभरात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची माहिती आहे. त्यामुळे या एजन्सीने देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची श्वानपथकासह कसून तपासणी करण्यात येत आहे.नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १२५ ते १४० रेल्वेगाड्या तसेच ४० ते ४५ हजार प्रवाशी ये-जा करतात. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला देशात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची सूचना मिळाली आहे. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची तपासणी सुरू केली आहे. रेल्वेगाडी आली की रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक कोचमध्ये जाऊन तपासणी करीत आहेत. श्वानपथकाच्या मदतीने संशय आलेल्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी रात्रीही रेल्वे सुरक्षा दलाने जवळपास २० रेल्वेगाड्यांची तपासणी केली. सोमवारी दिवसा आणि रात्री तपासणी सुरूच होती. लोहमार्ग पोलिसांकडूनही रेल्वेगाड्यांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या साह्याने संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ही तपासणी सुरूच राहणार असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.सीसीटीव्हीद्वारे रेल्वेस्थानकावर ‘वॉच’नागपूर रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कक्षातील आरपीएफ जवानांनाही रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालीची बारकाईने पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.रेल्वेगाड्यात पेट्रोलिंग वाढविली‘सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वेगाड्यात लोहमार्ग पोलिसांची पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या साह्याने संशयीतांची तपासणी करण्यात येत आहे.’विश्व पानसरे, लोहमार्ग पोलीस अधीक्षक

टॅग्स :railwayरेल्वेBombsस्फोटके