भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:14 IST2021-02-23T04:14:18+5:302021-02-23T04:14:18+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : भरधाव ट्रेलरने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू ...

The trailer hit the bike | भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक

भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : भरधाव ट्रेलरने माेटारसायकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चमेली शिवारात साेमवारी (दि. २२) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

योगेश मोहनलाल शाहू (५५, रा. गांधी लेआऊट, कोंढाळी, ता. काटाेल) असे मृताचे नाव आहे. योगेश शाहू हे कोंढाळी-नागपूर मार्गावरील सोलार कंपनीत कामगार म्हणून काम करायचे. ते एमएच-४०/एयू-२७८६ क्रमांकाच्या माेटारसायकलने काेंढाळीहून नागपूरच्या दिशेने जात हाेते. ते मसाळा राेड टी पाॅइंटहून महामार्गावर वळताच मागून अर्थात अमरावतीहून नागपूरच्या दिशेने वेगात जात असलेल्या एमएच-३८/एक्स-८८८० क्रमांकाच्या ट्रेलरने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली.

माेटारसायकलसह याेगेश ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. अपघात हाेताच चालकाने ट्रेलर साेडून पळून गेला हाेता. त्यानंतर ट्रेलरचालक मनोजकुमार सोहनलाल यादव (२४, रा. सुधावाई, जिल्हा भदोई, उत्तर प्रदेश) यास अटक केली. ताे मुंबईहून साहित्य घेऊन कोंढाळी नजीकच्या केलटेक कंपनीत जात होता. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक राम ढगे करीत आहेत.

Web Title: The trailer hit the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.