शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायने १०० फ्री चॅनल विनामूल्य करावे : ग्राहक पंचायतची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:07 IST

१०० चॅनलचे दरमहा १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ट्रायने (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) १०० चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारूनये, ते पूर्णपणे विनामूल्य करावे आणि प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपये करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १०० चॅनलचे दरमहा १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ट्रायने (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) १०० चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारूनये, ते पूर्णपणे विनामूल्य करावे आणि प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.फ्री चॅनलमध्ये बरेचसे चॅनल ग्राहक बघणारच नाहीतच. त्यानंतरही ट्रायने १३० रुपये मासिक शुल्क आणि त्यावर १८ टक्के अर्थात २३.४० रुपये आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना बेसिक शुल्काच्या नावाखाली १५४ रुपये अनावश्यक भरावे लागणार आहे. म्हणजेच प्रत्येक चॅनलला १.५४ रुपये पडणार आहे. मग हे फ्री चॅनल कसे, असा सवाल पांडे यांनी उपस्थित केला. पूर्वी झी, सोनी, स्टार ग्रूप, कलर्स आणि अन्य ग्रुपच्या पॅकेजचे दर ठरलेले होते. त्या सर्व ग्रुपचे दर ग्राहकांच्या इच्छेविना तसेच बरेच चॅनल ग्राहक पाहत नसतांनासुद्धा ग्राहकांवर अनावश्यक लादले जात होते. यापासून ट्रायने ग्राहकांची सुटका केली आहे. ग्राहकांना सध्या जे चॅनल आवडतात ते सर्व पेड झाले आहे. परंतु ग्राहकांच्या आवडीचे चॅनलचे दर हे १९ रुपयांपर्यंत वाढविले आहेत. हा ग्राहकांवर अन्याय आहे.टीव्ही मनोरंजनाचे साधन झाले तरीही ती आवश्यक सेवा झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरून कुठल्यातरी मोठ्या कंपन्यांचा फायदा करण्याच्या दृष्टीने ट्रायने दरवाढीचे पाऊल उचलल्याची शंका पंचायतने व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी हस्तक्षेप करुन १ फेब्रुवारी २०१९ पासून होणाऱ्या टीव्ही केबल शुल्क दरवाढीला स्थगिती द्यावी आणि १०० फ्री चॅनल कुठलेही शुल्क न आकारता पूर्णपणे विनामूल्य करावे आणि सर्व पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे सचिव संजय धर्माधिकारी, उपाध्यक्ष डॉ. नारायण मेहेरे, सुधीर मिसार, डॉ. अजय गाडे, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शर्मा, उपाध्यक्ष दत्तात्रय कठाळे, शहर अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते यांनी केली आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनconsumerग्राहक