शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मध्येच बोलले...
2
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
3
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
4
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
5
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
6
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
7
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
8
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
9
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
10
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
11
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
12
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
13
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
14
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
15
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
16
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
17
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
18
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
19
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
20
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी

राष्ट्रभूमी, मातृभूमी अन् प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:00 AM

राष्ट्रभूमी, मातृभूमी आणि प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा ‘सिनेमॅटिक’ अंदाजाने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे.

ठळक मुद्दे ‘लाईव्ह’ प्रसंगांनी नाटकात आणली बहार५९ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

प्रवीण खापरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीर आणि काश्मीरमधील घडामोडींबाबत अनभिज्ञ आहेत, असे साधारणत: अभावानेच सापडतील. भलेही तेथील वास्तविकतेचे मर्म कुणालाही कळणार नाही. आॅगस्ट २०१९ मध्ये भारत सरकारने रद्द केलेल्या ‘कलम ३७०’मुळे तर अनेकांच्या आनंदाला धुमारे फुटले आहेत. मात्र, स्थानिक खरेच या घटनेबाबात काय विचार करतात, याचा विचार कुणीच करू इच्छित नाही. या सगळ्या पार्श्वभूमीचा वेध घेणारे नाटक म्हणजे ‘किश्त बहार’. राष्ट्रभूमी, मातृभूमी आणि प्रेमभूमीत अडकलेल्या काश्मिरींची व्यथा ‘सिनेमॅटिक’ अंदाजाने मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे. काहीअंशी हा प्रयत्न यशस्वी ठरला असला तरी कथानकात जे पूर्णत्व हवे, प्राप्त होत नाही. अर्थात, नाट्य सादरीकरणाला अनेक मर्यादा असल्याने कदाचित ते असू शकते.महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नागपूर केंद्रावर लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सुरू असलेल्या ५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मंगळवारी सलीम शेख लिखित व दिग्दर्शित ‘किश्त बहार’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर झाले. नाटकाची सुरुवात किश्तवाडमधील नाराज काश्मिरींच्या कुप्रसिद्ध अशा दगडफेकीपासून होते. दूरचित्रवाणीवर असे प्रसंग घरबसल्या अनेकांनी बघितले आहेत. अशाच घटनेत सापडलेली काश्मिरी पंडित मुलगी आयेशा भट (आयेशा शेख) व अनेक संकटे झेलूनही आनंद मानणाऱ्या तिच्या कुटुंबीयांभोवती हे नाटक पूर्णत: केंद्रित आहे. त्याला पाकिस्तानधार्जिणा अलगाववाद, काश्मिरींना हवी असलेली स्वत:ची आझादी आणि या सगळ्यात कोणताही प्रश्न उपस्थित न करता जात, पंथ, धर्म आणि राज्यांच्या सीमा बाजूला ठेवून इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावणाºया सैनिक संघर्षाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सोबतीला प्रेमकथेची जोडही आहे. कथा रंजक आहे आणि कदाचित मयताच्या टाळूवर पोळी शेकणाºया राजकारण्यांच्या आणि मोबाईलवर कसलाही विचार न करता कलम ३७० रद्द झाल्यानंतर घरबसल्या काश्मिरींवर लज्जास्पद जोक्स तयार करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.भारत, काश्मीर आणि प्रेम करावा असा निसर्ग यावरील संवाद टाळ्या घेणाºया ठरल्या. नाटकात बर्फवृष्टी, झिल, बर्फाच्छादित पर्वत, भारत-पाकिस्तान सीमा आणि बॉम्बस्फोट यांचे लाईव्ह दर्शन करवून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिलेला धक्का सुखावणारा आहे. या सगळ्या सिनेमॅटिक जर्नीमध्ये ३७० कलमबाबत जादा वाच्यता केली असती तर नाटकाचे सार्थक झाले असते. एवढी उणीव सोडली तर नाटक कसलेले आहे. एकूणच काय तर देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या या नाटकाच्या सुखद समारोपानंतर ‘भारत माता की जय’ असा जयघोष प्रेक्षागृहातून निघणारच. नाटकात संध्या भट्ट (संयुक्ता थोरात), सैनिक राशिद (सचिन गिरी), रंजित भट्ट (सलीम शेख), संजित भट्ट (आदेश जामनिक), गिलानी व खान (परीक्षित हरसोले), नूर (भाग्यश्री देठे), कमांडर (रोहित गिल), भाभी (रुचिता पडिया), भाई (मंगेश रौराळे), जफर (लकी वानखेडे), अतिक (पंकज काळे), आफताब (सुशील शेंडे), साहिल (तुषार सोयम), सैनिक (प्रिन्स पाटील व राहुल चव्हाण) यांच्या भूमिका होत्या. प्रकाशयोजना मिथून मित्रा, पार्श्वसंगीत हेमंत डिके, नेपथ्य सौरभ दास व राजेश काळे, रंगभूषा नलिनी बन्सोड, वेशभूषा अश्विनी पिंपळकर यांची होती. सूत्रधार म्हणून पूजा पिंपळकर यांनी सूत्र सांभाळले.

टॅग्स :artकला