शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्कूल व्हॅन’ने घेतला पेट : विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 20:44 IST

विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी जात असलेल्या सारस्वत पब्लिक स्कूल, सावनेरच्या ‘स्कूल व्हॅन’ने अचानक पेट घेतला. घटनेच्या वेळी चालकाव्यतिरिक्त ‘स्कूल व्हॅन’मध्ये कुणीही नसल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील मंगसा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी जात असलेल्या सारस्वत पब्लिक स्कूल, सावनेरच्या ‘स्कूल व्हॅन’ने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच चालकाने ‘स्कूल व्हॅन’ रोडच्या कडेला उभी केली आणि बाजूला झाला. घटनेच्या वेळी चालकाव्यतिरिक्त ‘स्कूल व्हॅन’मध्ये कुणीही नसल्याने अनर्थ टळला. ही घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-केळवद मार्गावरील मंगसा शिवारात मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.सारस्वत पब्लिक स्कूलमधील पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग रोज सकाळी ११ वाजता सुरू होत असल्याने चालक देवराव माणिकराव घोळसे, रा. सावनेर हे एमएच-४०/एटी-०११४ क्रमांकाची ‘स्कूल व्हॅन’ (टाटा मॅजिक) घेऊन केळवद परिसरातील गावांमधील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात होते. ही ‘स्कूल व्हॅन’ सारस्वत पब्लिक स्कूलच्या मालकीची आहे. या ‘स्कूल व्हॅन’मध्ये इयत्ता सातवी ते नववीतील विद्यार्थी रोज शाळेत ये-जा करतात.दरम्यान, ती ‘स्कूल व्हॅन’या मार्गावरील मंगसा शिवारात पोहोचताच घोळसे यांना आत जळकट वास यायला सुरुवात झाली. संशय आल्याने त्यांनी ‘स्कूल व्हॅन’ लगेच रोडच्या बाजूला करून थांबविली आणि ती सोडून बाजूला झाले. काही वेळातच त्या ‘स्कूल व्हॅन’ने पेट घेतला. त्यावेळी ‘स्कूल व्हॅन’मध्ये कुणीही नव्हते. हीच घटना विद्यार्थ्यांना शाळेत आणताना किंवा शाळेतून घरी पोहोचविताना घडली असती तर अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही दिसून आले. सदर घटनेमुळे या मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.कंडक्टरची नियुक्ती कराया ‘स्कूल व्हॅन’मध्ये आजनी व केळवद येथील एकूण पाच विद्यार्थी रोज शाळेत ये-जा करतात. त्या ‘स्कूल व्हॅन’मध्ये चालक व विद्यार्थ्यांव्यतिरिक्त कुणीही नसते. ‘स्कूल व्हॅन’मधील विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच आपातकालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी कुणीतरी असायला हवे. त्यामुळे या ‘स्कूल व्हॅन’मध्ये कंडक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे. ही ‘स्कूल व्हॅन’ डिझेलवर चालणारी असून, तिने शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला असावा, अशी शक्यताही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली.

टॅग्स :fireआगSchoolशाळाPublic Transportसार्वजनिक वाहतूकStudentविद्यार्थी