व्यापाऱ्याला लुटणारा अडकला

By Admin | Updated: July 13, 2016 03:29 IST2016-07-13T03:29:43+5:302016-07-13T03:29:43+5:30

चाकूचे घाव घालून धान्य व्यापाऱ्याला लुटणारा कुख्यात गुंड फैजान खान (रा. संत्रा मार्केट) याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

The trafficker escaped the looter | व्यापाऱ्याला लुटणारा अडकला

व्यापाऱ्याला लुटणारा अडकला

साथीदार फरार : व्यापाऱ्यात असंतोष
नागपूर : चाकूचे घाव घालून धान्य व्यापाऱ्याला लुटणारा कुख्यात गुंड फैजान खान (रा. संत्रा मार्केट) याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. त्याचे साथीदार मात्र फरार आहेत. रविवारी रात्री दोसर भवन चौकाजवळ ही घटना घडली होती.
धान्य व्यापारी रत्नेश जितेंद्र गुप्ता आणि त्यांचा भाऊ रूपेश हे दोघे रविवारी रात्री १० च्या सुमारास मोटरसायकलने अग्रसेन चौकातून दोसर भवन चौकाकडे जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र योगेश पुरोहितही होते. आर्य समाज भवनजवळ आरोपी फैजान आपल्या साथीदारांसह उभा होता. त्याने रत्नेशला थांबवून जबरदस्तीने रक्कम हिसकण्याचा प्रयत्न केला. गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली.
विरोध केला असता फैजान आणि त्याच्या साथीदारांनी रत्नेशवर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. रत्नेशच्या मदतीला धावलेल्या योगेश याच्यावरही आरोपींनी चाकूहल्ला केला. या घटनेमुळे व्यापारीवर्गात तीव्र असंतोष पसरला होता. मोठ्या संख्येत व्यापाऱ्यांनी मेयो तसेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींच्या गुंडगिरीचा निषेध नोंदवत व्यापाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे मध्यरात्री १२.३० पर्यंत मोठा तणाव होता. पोलिसांनी धावपळ करून आरोपी फैजानला पहाटे अटक केली. त्याला कोर्टात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)

 

Web Title: The trafficker escaped the looter