शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

वाहतूक कोंडीत अडकले, प्रवाशांचे विमान हुकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:53 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. याचा फटका विमानतळावर जाणाऱ्या व्हीआयपींनाही बसला. वाहतूक कोंडीत अडकल्याने १२ प्रवाशांना विमान मिळाले नाही, अशी माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विस्कळीत : वाहनचालक त्रस्त

आॅनलाईन लोकमत

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. याचा फटका विमानतळावर जाणाऱ्या व्हीआयपींनाही बसला. वाहतूक कोंडीत अडकल्याने १२ प्रवाशांना विमान मिळाले नाही, अशी माहिती पुढे आली आहे. ज्यांच्याकडे थोडा वेळ होता त्यांना सामानासह विमानतळावर धावपळ करावी लागली.शहरातील रहदारीच्या घडामोडी प्रामुख्याने वर्धा मार्गावर घडतात. विमानतळावरून शहरात येण्यासाठी हा एकच मार्ग आहे. त्यातच मेट्रो रेल्वेच्या कामामुळे हा मार्ग ठिकठिकाणी अरुंद झाला आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधीत या मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु परिस्थिती नियंत्रणात राहणार असल्याचा दावा पोलीस करीत होते. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा दावा फोल ठरला. शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा रोडने जाणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला.डॉ. बाबासाहेब आंंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य मार्गावर हॉटेल प्राईडसमोर सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चक्काजाम केला. थोड्याच वेळात या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यात यश आले नाही. त्यानंतर त्यांनी आऊ टर रिंगरोडने वाहतूक वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे ज्यांना वर्धेला जायचे होते वा नागपूर शहरात यावयाचे होते त्यांना कमालीचा त्रास झाला. असे असले तरी विमानतळावर जाण्यासाठी वर्धा मार्गाला पर्यायी रस्ता नसल्याने वाहतुकीची कोंडी झालीच.सकाळी मुंबई, पुणे व दिल्लीकडे विमाने रवाना झाली. काही प्रवासी आंदोलनापूर्वी विमानतळावर पोहोचले होते. मात्र १२ प्रवासी वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांचे विमान हुकले. अनेक प्रवाशांना धावपळ केल्याने विमान मिळाले, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केलेराष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केले. सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह जवानांना तैनात करण्यात आले होते. वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होताच आऊ टर रिंगरोड व मनीषनगर मार्गे वाहतूक वळविण्याचा प्रयत्न केला.रवींद्र परदेशी

सहायक पोलीस आयुक्त वाहतूक

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन