शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाघोबा रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा खोळंबा, धरमखिंड-चिकना मार्गावरील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 21:53 IST

मार्गावरून ये जा करणाऱ्यांना काही अंतरावरच चक्क वाघोबाचे दर्शन होताच अनेकांची भंबेरी उडाली. वाघोबाच्या या रस्त्यावरील मुक्कामाने एसटी बस, खाजगी चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहनचालक थांबले.

नागपूर - उमरेड येथून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या धरमखिंड ते चिकना मार्गादरम्यान वाघोबाने रस्त्यावर ठाण मांडले. या मार्गावरून ये जा करणाऱ्यांना काही अंतरावरच चक्क वाघोबाचे दर्शन होताच अनेकांची भंबेरी उडाली. वाघोबाच्या या रस्त्यावरील मुक्कामाने एसटी बस, खाजगी चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहनचालक थांबले.आज १८ डिसेंबर ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार अनेकांना बघावयास मिळाला. उमरेड येथून पचखेडी येथे एमएच १४ बी आय ०८६३ या क्रमांकाची एसटी जात होती. अशातच  कुही तालुक्यातील तारणा येथून केवळ ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धरमखिंड ते चिकना दरम्यान रस्त्यावरच वाघ बसून होता.  वाघ दिसताच बस थांबविण्यात आली. त्यापाठोपाठ खाजगी चारचाकी व दुचाकी वाहने सुद्धा थांबविण्यात आले. साधारणतः अर्धा तास वाघ रस्त्यावरच होता. त्यानंतर गर्दी चांगलीच वाढली. लागलीच वाघोबाने जंगलाचा आडोसा घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या तीन गावांना धोकाचिकना, धामना आणि बुटीटोला ही तीन गावे उमरेड- करांडला-पवनी अभयारण्याला खेटून आहेत. अभयारण्याने वेढलेल्या या गावकऱ्यांना हिस्त्र स्वापदांचा चांगलाच त्रास होतो. यामुळे या तीनही गावाला चांगलाच धोका संभवतो. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान या परिसरात होत असते. यामुळे वनविभागाने योग्य पाऊल उचलण्याची मागणी चार वर्षांपासून होत आहे. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शैलेश जुमडे,  प्रकाश शिवरकर, गोलू मांढरे, भगवान शिवरकर, विठ्ठल मांढरे, सुनीता शिवरकर, कल्पना वाघमारे, निर्मला शिवरकर, सलमा रामटेके, माया कळंभे, अशोक शिवरकर आदींनी केली आहे. 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर