अवैध पार्किंगमुळे रहदारीस अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:05+5:302020-12-25T04:08:05+5:30
रामटेक : शहरातील महात्मा गांधी चाैक ते जैन मंदिर राेड वर्दळीचा आहे. या मार्गालगत माेठ्या प्रमाणात दुचाकी वाहने उभी ...

अवैध पार्किंगमुळे रहदारीस अडसर
रामटेक : शहरातील महात्मा गांधी चाैक ते जैन मंदिर राेड वर्दळीचा आहे. या मार्गालगत माेठ्या प्रमाणात दुचाकी वाहने उभी केली जात असल्याने रहदारीस अडसर निर्माण हाेत आहे. या अवैध पार्किंगमुळे हा मार्ग अरुंद हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
रामटेक शहरातील महात्मा गांधी चाैक ते जैन मंदिर राेड हा महत्त्वाचा असून, या मार्गावरून सतत वाहनांची ये-जा सुरू असते. या मार्गालगत डाॅक्टरांचे दवाखाने, मेडिकल स्टाेअर्स, साेन्या-चांदीची दुकाने, किराणा दुकाने यासह अन्य व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांची वाहने दुकानांसमाेर अर्थात या मार्गाच्या कडेला दुतर्फा उभी करतात. त्यामुळे या मार्गाच्या दाेन्ही बाजूला पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
उभ्या वाहनांमुळे हा मार्ग अरुंद हाेताे. त्यामुळे कार व इतर चारचाकी वाहने मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते. वाहनांचा चुकून उभ्या माेटरसायकलला धक्का लागल्यास वादही उद्भवतात. हा प्रकार स्थानिक पालिका प्रशासनाला माहीत आहे. मात्र, यावर ताेडगा काढण्यास कुणीही पुढाकार घेत नाही. अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्नही स्थानिक नागरिकांनी केला आहे.
...
फूटपाथमुळे राेड अरुंद
हा मार्ग आधीच अरुंद आहे. पूर्वी या मार्गाच्या दाेन्ही बाजूला समतल नाल्या हाेत्या. नागरिक त्या झाकलेल्या नालींचा वावर त्यांची वाहने उभी ठेवण्यासाठी करायचे. पालिका प्रशासनाने त्या दाेन्ही नाल्यांवर एक मीटर रुंदीचे फूटपाथ तयार केले आहे. फूटपाथ उंच असल्याने नागरिकांना त्यावर वाहने उभी ठेवता येत नाही. त्यामुळे हा मार्ग पूर्वीच्या तुलनेत दाेन मीटरने अरुंद झाला आहे. या मार्गालगतच्या वाहनांची गर्दी अपघाताच्या पथ्यावर पडत आहे.