शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था ‘रामभरोसे’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 22:44 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते ही शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती. त्यामुळे अधिवेशन काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले असता त्यात चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शहरात असा जाम लागला की वाहतूक विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची गैरहजेरी, असले तरी चालान फाडण्यात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते ही शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती. त्यामुळे अधिवेशन काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले असता त्यात चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शहरात असा जाम लागला की वाहतूक विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. सर्वसामान्य नागरिक जाममुळे त्रस्त झालेत. गुरुवारी ‘लोकमत’ने वाहतूक विभागाच्या तयारीची पडताळणी करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांना भेट दिली असता बहुतांश चौकात वाहतूक पोलीस दिसलेच नाहीत. तर ज्या चौकात वाहतूक पोलीस होते तेथे ते चालान फाडण्यात आणि आपसात गप्पा मारण्यात व्यस्त असल्याचे चित्र दृष्टीस पडले.शहरात सुरु असलेल्या महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामामुळे आधीच वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे जाम लागण्याची शक्यता वाहतूक विभागाला प्रशासनाने देऊन आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. तरीसुद्धा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध चौकात आणि मार्गावर जाम लागला होता. त्यानंतर गुरुवारी ‘लोकमत’च्या चमूने शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली असता बहुतांश मार्गावर वाहतूक पोलिसांची गैरहजेरी आढळली. वाहतूक व्यवस्था रामभरोसे सुरु होती. ज्या चौकात नेहमीच जामची समस्या असते तेथेही वाहतूक विभागाने कोणतीच व्यवस्था केलेली नव्हती. काही चौकात वाहतूक पोलीस दिसले परंतु ते चालान फाडण्यात व्यस्त होते. काही वाहतूक पोलीस चहा पिताना दिसले तर मोजकेच वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रित करत होते.‘लोकमत’ने काय पाहिले

  • काटोल नाका चौकात वाहतूक पोलीस चहा टपरीवर बसलेले दिसले
  • पोलीस लाईन तलाव चौकात एक वाहतूक पोलीस झाडाच्या सावलीत उभा होता
  • पागलखाना चौकात वाहतूक पोलीस चालान फाडण्यात व्यस्त होता
  • ट्रॅफिक पार्क चौकात एकटा पोलीस कर्मचारी ड्युटीवर तैनात होता
  • लॉ कॉलेज चौकात वाहतूक पोलीस गैरहजर होते
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर