परंपरागत हॅण्डलूम व आधुनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:24+5:302020-11-28T04:04:24+5:30
\Sनागपूर : विविध राज्यांमधील कॉटन व सिल्कचे सुप्रसिद्ध आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असणारे तब्बल ८० स्टॉल्स असणारे प्रदर्शन व ...

परंपरागत हॅण्डलूम व आधुनिक
\Sनागपूर : विविध राज्यांमधील कॉटन व सिल्कचे सुप्रसिद्ध आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असणारे तब्बल ८० स्टॉल्स असणारे प्रदर्शन व विक्री बुधवारपासून सुरू झाले आहे. प्रदर्शन चिटणीस सेंटर, हिस्लॉप कॉलेजजवळ, सिव्हिल लाईन्स येथे सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत २५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत खुले राहणार आहे. हॅण्डलूमवर उत्कृष्ट कलाकुसर करणाऱ्या विणकरांनी विणलेल्या कॉटन व विविध प्रांतातील सिल्क साड्या, ड्रेस मटेरियल, सूट, स्टोल्स, कुर्ता, कुर्ती, दुपट्टे यासह फॅशन ज्वेलरी व गृहसजावटीची विविध आकर्षक व एकमेव उत्पादने उपलब्ध आहेत. या उत्पादनांपैकी काहींवर डिस्काऊंट देण्यात येत आहेत. इतर उत्पादनांची थेट कारागिरांकडून विक्री होत असल्याने बाजारभावापेक्षा कमी किमतीत उत्कृष्ट दर्जा व अस्सल उत्पादने उपलब्ध आहेत. देशातील बिहारची भागलपुरी सिल्क, टसर सिल्क, कोसा व खाली सिल्क, उत्तरप्रदेशची लखनवी चिकनवर्क, जामदनी आणि अनारसी सिल्क, मध्य प्रदेशातील माहेश्वरी सिल्क व चंदेरी, तसेच गुजरातची पटोला, बांधणी, कच्छी एम्ब्रायडरी व राजस्थानची बांधेज, ब्लॉक प्रिंट व सांगनेरी प्रिंट, कर्नाटकची बंगलोर सिल्क व प्रिंटेट के्रप, ताबी सिल्क व कलाकुसरयुक्त जम्मू-काश्मीरची प्रसिद्ध बंगाल व छत्तीसगडची बालुचेरी, कथा, तांडिल व जामदनी कोसा सिल्क व आदिवासी काम केलेली उत्पादने विक्रीस आहे. यामध्ये आंध्रप्रदेशचे धर्मावरम, गडवाल, व्यंकटगिरी, मंगळगिरी, उप्पदा, कमलकारी आणि पोचमपल्ली प्रदर्शनात आहेत. प्रदर्शन परंपरागत हॅण्डलूम कलाकुसर आणि आधुनिक जीवनशैलीची सांगड घालणारे आहे. नि:शुल्क प्रवेश आणि पार्किंग व्यवस्था आहे. सणासुदीत नवीन पेहरावाची खरेदी स्वस्तात करावी, असे सोसायटीचे अध्यक्ष मानस आचार्य उडिसा यांनी म्हटले आहे. (वा.प्र.)