शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

व्यापाऱ्यांनी एफडीए नियमांचे पालन करावे : सहआयुक्त चंद्रकांत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:08 AM

व्यापाऱ्यांनी डिजिटल पद्धतीने ग्राहकांना उत्तम सुविधा आणि सेवा देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी येथे केले.

ठळक मुद्दे एनव्हीसीसीमध्ये चर्चासत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : स्पर्धेत व्यापाऱ्यांनी ग्राहकांना गुणवत्तेचे उत्पादन द्यावे. व्यापारी गुणवत्तेच्या उत्पादनासह एफडीएच्या नियमांचे पालन करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. व्यापाऱ्यांनी डिजिटल पद्धतीने ग्राहकांना उत्तम सुविधा आणि सेवा देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी येथे केले.नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यकारिणी सभेत चर्चेदरम्यान मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे (मुंबई) सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद महाजन, ललित सोयाम, प्रफुल्ल टोकले, किरण गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले. परिचय अन्न सुरक्षा व औषधी उपसमितीचे संयोजक अ‍ॅड. निखिल अग्रवाल आणि उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा यांनी करून दिला.शशिकांत केकरे म्हणाले, व्यापाऱ्यांनी खाद्यान्नाशी संबंधित नियमांचे पालन करून व्यवसाय करावा. यामध्ये एफडीएची भूमिका नेहमीच मदतीची राहील. अश्विन मेहाडिया म्हणाले, चेंबरच्या व्यापाऱ्यांनी नेहमीच जनहितार्थ काम केले आहे. चुकीचे काम न करता नेहमीच सरकारी नियमांचे पालन करून व्यवसाय केला आहे. व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले.संचालन आणि आभार सचिव रामअवतार तोतला यांनी केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष गोविंदलाल सारडा, प्रफुल्ल दोशी, बी.सी. भरतीया, हेमंत खुंगर, दीपेन अग्रवाल, प्रकाश मेहाडिया, उपाध्यक्ष फारुकभाई अकबानी, संजय के. अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, शब्बार शाकीर, जनसंपर्क अधिकारी राजू माखिजा यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागbusinessव्यवसाय