व्यापार्‍याचे ४० लाख लुटले

By Admin | Updated: May 21, 2014 01:04 IST2014-05-21T01:04:38+5:302014-05-21T01:04:38+5:30

लुटारूंनी गोळीबार करून साखर व्यापार्‍याचे ४० लाख रुपये लुटून नेले. आज रात्री ११ वाजता छापरूनगरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

Traders get 40 million looted | व्यापार्‍याचे ४० लाख लुटले

व्यापार्‍याचे ४० लाख लुटले

 दहशत : छापरूनगरात गोळीबार

नागपूर : लुटारूंनी गोळीबार करून साखर व्यापार्‍याचे ४० लाख रुपये लुटून नेले. आज रात्री ११ वाजता छापरूनगरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. साखर व्यापारी रोचिराम ऊर्फ हरीश फुलवानी हे छापरूनगर (लकडगंज) येथे राहतात. त्यांचे इतवारीत दुकान आहे. आज रात्री दुकान बंद करून दिवसभराच्या व्यवहाराचे ४० लाख रुपये बॅगमध्ये भरून ते आपल्या घराकडे निघाले. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच मोटरसायकलवरील चार भामट्यांनी त्यांना अडवले. हवेत गोळीबार करून त्यांच्याजवळची ४० लाखांची बॅग लुटारूंनी हिसकावून घेतली. दरम्यान, फुलवानी यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी मोठ्या संख्येत नागरिक धावून आले. त्यांनी पळून जाणार्‍या चारपैकी एका लुटारूला पकडून बेदम चोप दिला. या घटनेची माहिती कळताच लकडगंज पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यांनी आरोपीच्या शोधासाठी सर्वत्र पथके पाठवली. पकडल्या गेलेल्या आरोपीला बोलते करण्याचे प्रयत्न मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: Traders get 40 million looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.