शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाहतूक पोलिसाचा जॅमर चोरणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:59 IST

Stealing traffic police jammer, arrested, crime news वाहतूक पोलिसांचा जॅमर घेऊन फरार झालेल्या बीएमडब्ल्यूच्या मालकास सदर पोलिसांनी अटक केली.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: वाहतूक पोलिसांचा जॅमर घेऊन फरार झालेल्या बीएमडब्ल्यूच्या मालकास सदर पोलिसांनी अटक केली. दीपक लेडवानी, रा. मेघधनुष्य अपार्टमेंट जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. दीपकचे सीताबर्डीत मोबाईलचे दुकान आहे. जॅमर चोरीची घटना १ डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. दीपकने त्याची बीएमडब्ल्यू कार एमएच-३१-एफए-३९११ ही माऊंट रोडवरील नो पार्किंगमध्ये उभी केली होती. सदर वाहतूक शाखेचे सईद अहमद यांनी कारला जॅमर लावला. तसेच कारच्या ग्लासवर आपला मोबाईल नंबर असलेले कागद चिकटविले. परंतु दीपक जॅमर घेऊन फरार झाला. खूप वेळ होऊनही त्याचा फोन न आल्याने अहमद यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता आरोपी जॅमरसह कार घेऊन फरार झाल्याचे आढळून आले. वाहतूक पोलिसांनी दीपकशी संपर्क साधून त्याला दंड भरायला लावला. परंतु त्याने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी जॅमर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दीपकला अटक करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. परंतु आरोपीच्या वकिलाने जॅमर व कार पोलिसांना सोपवण्यात येईल, असे सांगून कोठडीचा विरोध केला. यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसtheftचोरीArrestअटक