ट्रॅक्टरची ट्राॅलीचाेर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:58+5:302021-07-28T04:08:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : ट्रॅक्टरची ट्राॅली चाेरून नेणाऱ्या दाेन चाेरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत त्यांच्याकडून सात ...

ट्रॅक्टरची ट्राॅलीचाेर अटकेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : ट्रॅक्टरची ट्राॅली चाेरून नेणाऱ्या दाेन चाेरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत त्यांच्याकडून सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना रामटेक शहरात घडली असून, चाेरट्यांना कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात अटक करण्यात आली.
रवी बापूजी वाडीभस्मे (२९, रा. अराेली, ता. माैदा) व प्रदीप सहदेव डाेकरीमारे (२७, रा. काचूरवाही, ता. रामटेक) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना दाेघेही विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रामटेकच्या दिशेने जात हाेते. त्या ट्रॅक्टरला एमएच-४०/ए-४०३२ क्रमांकाची ट्राॅली जाेडली हाेती. संशय आल्याने पाेलिसांनी त्यांना थांबण्याची सूचना केली. मात्र, त्यांनी सुरुवातीला पळून जाण्याचा प्रयत्न केला तर नंतर असंबद्ध उत्तरे दिली.
त्यातच हा ट्रॅक्टर जावयाच्या नावे विकत घेतल्याची माहिती रवीने पाेलिसांना दिली. मात्र ती ट्राॅली चाेरीची असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दाेघांना अटक करीत रामटेक पाेलिसांच्या स्वाधीन केले. शिवाय, त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपयांचा ट्रॅक्टर व ५० हजार रुपयांची ट्राॅली असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे, शिपाई ज्ञानेश्वर राऊत, दिनेश अधापुरे, विपीन गायधने यांच्या पथकाने केली.
...
पैशाअभावी चाेरी
ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर ट्राॅली खरेदी करण्यासाठी रवी वाडीभस्मकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने प्रदीपला साेबत घेऊन ट्राॅली चाेरून नेण्याची याेजना आखली. त्यांना साेमवारी (दि. १९) रात्री रामटेक शहरातील सीताराम इंजिनियरिंग या वर्कशाॅप समाेर एमएच-४०/ए-४०३२ क्रमांकाची ट्राॅली दिसली. तितथे कुणीही नसताना या दाेघांनी ती ट्राॅली ट्रॅक्टरला जाेडली व चाेरून नेली.