किरणापूर येथून ट्रॅक्टरची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:13 IST2021-09-04T04:13:14+5:302021-09-04T04:13:14+5:30

रेवराल : घरासमाेर उभा असलेला ट्रॅक्टर चाेरून नेल्याची घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील किरणापूर (जंगली) येथे नुकतीच ...

Tractor theft from Kiranapur | किरणापूर येथून ट्रॅक्टरची चाेरी

किरणापूर येथून ट्रॅक्टरची चाेरी

रेवराल : घरासमाेर उभा असलेला ट्रॅक्टर चाेरून नेल्याची घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील किरणापूर (जंगली) येथे नुकतीच घडली. त्या ट्रॅक्टरची किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

रवींद्र निळकंठ गायधने (४६, रा. किरणापूर जंगली, ता. माैदा) यांनी त्यांच्या मालकीचा एमएच-४०/एएम-५०३ क्रमांकाचा ट्रॅक्टर नेहमीप्रमाणे घरासमाेर उभा ठेवला हाेता. मध्यरात्रीच्या सुमारास घराजवळ कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्यांनी ताे ट्रॅक्टर चाेरून नेला. त्या ट्रॅक्टरची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. हा ट्रॅक्टर रवींद्र आठवले (रा. हिवरा), उमेश गायधने (रा. देव्हाळा) व किसन साेनवणे (रा. देवाडी) या तिघांनी चाेरून नेल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या प्रकरणी अराेली पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक अमाेल इंगाेले करीत आहेत.

Web Title: Tractor theft from Kiranapur