शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

श्वास सुरू असतानाच श्वसननलिका कापून जोडली, रुग्णाला जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:23 IST

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, रुग्णाला जीवनदान

ठळक मुद्देनागपूर हे मेडिकल हब होत आहे. सर्वच प्रकारच्या गुंतागुंतीच्या व दुर्मीळ शस्त्रक्रिया नागपुरात होऊ लागल्या आहेत. श्वसननलिकेचा एक भाग काढून जोडणे हे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वसननलिकेचा प्रभावित झालेला भाग काढून, रुग्णाचा श्वास सुरू असतानाच श्वसननलिका एकमेकांना जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया नागपूरच्याडॉक्टरांनी केली. यामुळे त्या रुग्णाला जीवदान मिळाले. श्वसननलिका २ मिलिमीटरपर्यंत अरुंद झाल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. विशेष म्हणजे, त्याला शस्त्रक्रियेसाठी दिल्लीला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

अमरावती येथील एका ३० वर्षीय तरुणाला अपघातामुळे डोक्याला गंभीर इजा झाली. तेथीलच एका रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेदरम्यान व्हेंटिलेटरची नळी घशापर्यंत टाकण्यात आली; परंतु नंतर व्हेंटिलेटरची नळी काढण्यातच आली नाही. फार काळ श्वसननलिकेत नळी राहिल्यामुळे श्वासनलिका आकुंचन पावली व ती तेथेच अडकली. नळी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शक्य झाले नाही. नागपूरच्या क्रिम्स हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी ब्रोंकोस्कोपी केली. श्वसननलिकेला सूज आल्याचे व पस जमा झाल्याचे निदान झाले. तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते; परंतु गुंतागुंतीची व दुर्मीळ शस्त्रक्रियेचा रुग्णाच्या जीवाला धोका होता.

अत्यंत क्लिष्ट व धोकादायक डॉ. अरबट यांनी सांगितले, शल्यचिकित्सक डॉ. गोपाल गुर्जर यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी केली. श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. परिमल देशपांडे व डॉ. स्वप्निल बाकमवार यांनी सहकार्य केले.

नागपूर हे मेडिकल हब होत आहे. सर्वच प्रकारच्या गुंतागुंतीच्या व दुर्मीळ शस्त्रक्रिया नागपुरात होऊ लागल्या आहेत. श्वसननलिकेचा एक भाग काढून जोडणे हे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे होते. डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर