शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार

By admin | Updated: July 30, 2016 02:38 IST

विदर्भात आणि विदर्भालगत आठ व्याघ्र प्रकल्प व दोन अभयारण्य असल्यामुळे नागपूरला देशाची व्याघ्र राजधानी संबोधले जाते.

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : ‘टायगर रॉक’चे उद्घाटन, ग्रामीण युवकांना रोजगार नागपूर : विदर्भात आणि विदर्भालगत आठ व्याघ्र प्रकल्प व दोन अभयारण्य असल्यामुळे नागपूरला देशाची व्याघ्र राजधानी संबोधले जाते. या ठिकाणी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून काही योजनाही दाखल केल्या आहेत. त्याचा फायदा देशविदेशातील पर्यटकांना होणार असून त्या भागातील ग्रामीण युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स चौक, सिव्हिल लाईन्स येथे ‘नागपूर-देशाची व्याघ्र राजधानी’ असा उल्लेख असलेल्या फेरो सिमेंटच्या दगडावर फायबर रेनफोर्स प्लास्टोने बनविलेल्या वाघांच्या दोन प्रतिकृतींच्या ‘टायगर रॉक’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. आयोजन सिव्हिल लाईन्स असोसिएशन नागपूर आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या समारंभात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक देवा उसरे, विलास काळे, कुमार काळे, सिव्हिल लाईन्स असोसिएशनचे अध्यक्ष सीए हेमंत लोढा, उपाध्यक्ष अनसूया काळे-छाब्रानी व अ‍ॅड. संजय किनखेडे, सचिव विक्रम नायडू, कोषाध्यक्ष सीए राजेश मुंधडा, अजय पाटील, संदीप ड्वेलर्स प्रा.लि.चे अनिल अगरवाला, गौरव अगरवाला प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, नागपूरला वाघापूर असे म्हटले जाते. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात ३५० पेक्षा जास्त वाघ आहेत. त्यामुळे देशविदेशातील पर्यटक विदर्भाकडे आकर्षित होत आहेत. या प्रकल्पाचा सर्वांगीण विकास करून पर्यटकांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘टायगर रॉक’ नागपूरचे आकर्षण ठरणार आहे. या समारंभात सिव्हिल लाईन्स असोसिएशनचे कार्यकारी समिती सदस्य अ‍ॅड. निशांत गांधी, अ‍ॅड. अनिल मूलचंदानी, राजेश केडिया, किशोर जिचकार, शीला तेनाय, सुनिता सुराणा, डॉ. दीपा जमवाल, कृष्णा राठी, प्रदीप माहेश्वरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) ‘टायगर रॉक’ आकर्षणाचे केंद्र टायगर रॉकची निर्मिती संदीप ड्वेलर्स प्रा.लि. (एसडीपीएल) या कंपनीने सामाजिक उपक्रमांतर्गत केली आहे. निर्मितीसाठी अडीच महिने लागले. यासाठी ७ लाख रुपयांचा खर्च आला. फेरो सिमेंटने तयार केलेल्या दगडावर फायबर रेनफोर्स प्लास्टोने तयार केलेल्या वाघांच्या दोन प्रतिकृती बसविण्यात आल्या आहे. ‘टायगर रॉक’ नागपूरचे आकर्षण ठरेल, असा विश्वास ‘एसडीपीएल’चे संचालक गौरव अगरवाला यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.