एक्सटेंशन बॉक्स बंद न करता वायरला हात लावणे जीवावर बेतले
By योगेश पांडे | Updated: July 4, 2024 16:44 IST2024-07-04T16:42:53+5:302024-07-04T16:44:09+5:30
Nagpur : वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

Touching the wire without closing the extension box is fatal
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक्सटेंशन बॉक्स बंद न करता वायरला हात लावणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. वीजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
महेश इंदरसिंग सिरसाम (२२, न्यू मनिषनगर, बेलतरोडी) असे मृतकाचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील कोरजा या गावचा निवासी होता. कामानिमित्त तो नागपुरला होता. तो न्यू मनिषनगर येथील प्लॉट क्रमांक १४ व १५ येथे बुधवारी इलेक्ट्रीकचे काम करत होता. एक्सटेंशन बॉक्सची वायर गुंडाळण्यासाठी घेतली, मात्र त्याने बॉक्सचे वीजेच्या सॉकेटला जोडलेले बटनच बंद केले नाही. त्याला जोरदार करंट बसला व बेशुद्ध झाला. त्याला नातेवाईकांनी मेडिकल इस्पितळात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.