आशा वर्कर्सला हवेत राज्य व केंद्राचे एकूण चार हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:09+5:302021-06-16T04:10:09+5:30

नागपूर : आशा व गटप्रवर्तकांनी मंगळवारी संविधान चौकात मुसळधार पावसात आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा ...

A total of four thousand rupees from the state and center to Asha workers | आशा वर्कर्सला हवेत राज्य व केंद्राचे एकूण चार हजार रुपये

आशा वर्कर्सला हवेत राज्य व केंद्राचे एकूण चार हजार रुपये

नागपूर : आशा व गटप्रवर्तकांनी मंगळवारी संविधान चौकात मुसळधार पावसात आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आशा वर्कर्स आणि सीटूचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सरकारला दिलेला आहे.

महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या १५ जूनपासून आयोजित राज्यव्यापी बेमुदत संपाची दखल घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयाच्या दालनात आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक १० जूनला आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान सहसंचालक महेश बोटले, राज्य अभियान कार्यक्रम अधिकारी अनिल दक्षिणे उपस्थित होते. आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने एम. ए. पाटील, राजू देसले, राजेंद्र साठे, श्रीमंत घोडके, राजेश सिंह, पद्माकर इंगळे उपस्थित होते.

आशांना दरमहा राज्य व केंद्र सरकारच्यावतीने दोन-दोन हजार रुपये मिळतात, मात्र महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी १६५० रुपये जमा होतात. संपूर्ण चार हजार रुपये मिळतील, याची दखल घ्यावी आणि कार्यवाही करावी, असे आदेश टोपे यांनी दिले. टोपे यांनी तात्काळ राज्यभर सीएचओ भरण्याचे आदेश दिले आणि मोबदला दिला जाईल, असे प्रतिपादन केले. धरणे आंदोलन प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, अंजू चोपडे, मंगला बागडे यांचे नेतृत्त्वात करण्यात आले. यावेळी हजारो आशा वर्कर्स व गट प्रवर्तक उपस्थित होते.

Web Title: A total of four thousand rupees from the state and center to Asha workers