डोरेमान पाहण्यासाठी आलेल्या चिमुकलीवर अत्याचार
By Admin | Updated: March 3, 2017 14:47 IST2017-03-03T14:45:43+5:302017-03-03T14:47:41+5:30
डोरेमान कार्टुन पाहायला आलेल्या सात वर्षाच्या चिमुकलीवर शेजारी राहणा-या 15 वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डोरेमान पाहण्यासाठी आलेल्या चिमुकलीवर अत्याचार
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3- डोरेमान कार्टुन पाहायला आलेल्या सात वर्षाच्या चिमुकलीवर शेजारी राहणा-या 15 वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे.
आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांचे शेजारी आहेत. बुधवारी दुपारी पीडित मुलीची आणि आरोपीची आई बाहेर गेल्या होत्या. यावेळी आरोपीच्या घरी कुणी नव्हते. दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास चिमुकली टीव्हीवरील डोरेमान कार्टुन पाहण्यासाठी आरोपी मुलाच्या घरी गेली होती त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केले.
रात्री मुलीला वेदना होऊ लागल्यामुळे आईने विचारणा केली असता पीडित मुलीने संध्याकाळी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गुरुवारी पीडित मुलीच्या पालकांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घोडवे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुधारगृहात रवानगी केली जाणार आहे.