अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST2021-09-14T04:11:49+5:302021-09-14T04:11:49+5:30

रामटेक : लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाेजापूर येथे साेमवारी ...

Torture of a minor girl, arrest of Arapis | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक

रामटेक : लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाेजापूर येथे साेमवारी (दि. १३) उघडकीस आली. दरम्यान, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.

गणेश लक्ष्मण मेंगरे (२६, रा. भाेजापूर, ता. रामटेक) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने १५ वर्षीय मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून रामटेकनजीकच्या खिंडसी परिसरातील एका लाॅजवर घेऊन गेला व तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आईने पाेलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (३), सहकलम ४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशा भुते करीत आहेत.

Web Title: Torture of a minor girl, arrest of Arapis