अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:09 IST2021-05-20T04:09:37+5:302021-05-20T04:09:37+5:30

हिंगणा : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर आराेपीने अत्याचार केला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेंढा परिसरात मंगळवारी (दि. ...

Torture of a minor girl, arrest of Arapis | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक

हिंगणा : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर आराेपीने अत्याचार केला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेंढा परिसरात मंगळवारी (दि. १८) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पीडित मुलीच्या तक्रारीवरून पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली आहे.

आकाश पुरुषाेत्तम उरिया (२३, रा. क्लस्टर ३ ए - कंचनगंगा अपार्टमेंट, माेंढा) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आपल्या क्वाॅर्टरमध्ये बाेलावून १५ ते २४ एप्रिलदरम्यान तिच्यावर तीन-चार वेळा लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, महिनाभरानंतर मुलीच्या पाेटात दुखणे वाढले. याबाबत तिच्या आईवडिलांनी विचारणा केल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला व घटनेची पाेलिसात तक्रार नाेंदविली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून हिंगणा पाेलिसांनी आराेपीला त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेत अटक केली. पाेलीस निरीक्षक सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास महिला पाेलीस उपनिरीक्षक अमृता साेमवंशी, हवालदार रवींद्र नेतनराव करीत आहेत.

Web Title: Torture of a minor girl, arrest of Arapis