अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:14 IST2021-03-04T04:14:46+5:302021-03-04T04:14:46+5:30
काटाेल : अल्पवयीन मुलीला कुठले तरी आमिष दाखवून आराेपीने तिला पळवून नेले आणि एका शेतात तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक
काटाेल : अल्पवयीन मुलीला कुठले तरी आमिष दाखवून आराेपीने तिला पळवून नेले आणि एका शेतात तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्यांतर्गत १७ फेब्रुवारी राेजी सायंकाळच्या सुमारास घडली.
रामलाल शालिकराम भलावी (३०, रा. जामरापानी, ता. साैंसर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. आराेपीने १५ वर्षीय मुलीला कुठले तरी आमिष दाखवून तिला पळवून नेले. त्यानंतर आराेपीने पीडित मुलीला एका शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून काटाेल पाेलिसांनी भादंवि कलम ३६३, ३७६(२)(जे)(एन)(३), सहकलम ४, ५(एल) ६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक आकाश शाही करीत आहेत.