असाहाय्य विधवा महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST2021-05-22T04:08:37+5:302021-05-22T04:08:37+5:30

कळमेश्वर : असाहाय्य विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील आदर्शनगरात नुकतीच घडली. यातील आराेपीस अटक करण्यात ...

Torture of a helpless widow | असाहाय्य विधवा महिलेवर अत्याचार

असाहाय्य विधवा महिलेवर अत्याचार

कळमेश्वर : असाहाय्य विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील आदर्शनगरात नुकतीच घडली. यातील आराेपीस अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

श्रावण बावणे (वय ५०, रा. आदर्शनगर, कळमेश्वर-ब्राह्मणी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. पीडित महिला ही ५५ वर्षांची असून, पतीच्या निधनानंतर ही दाेन मुलांना घेऊन राहते. आराेपी हा तिच्या धाकट्या बहिणीचा पती असून, ताे तिच्या घराशेजारीच राहताे. त्याने साेमवारी (दि. १७) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास तिच्या घरात मागच्या दारातून प्रवेश केला. त्याने मारहाण करीत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तिला व्यवस्थित ऐकू येत नसल्याने मध्यरात्री घरात काेण शिरले, याची जाणीव झाली नसल्याचे तसेच बहिणीची प्रकृती बरी नसल्याने हा अत्याचार आपण आजवर सहन केल्याचे तिने पाेलिसांना सांगितले. या प्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी तिच्या तक्रारीवरून गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक संताेष सिंग करीत आहेत.

Web Title: Torture of a helpless widow