शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जोराचा झटका लागला अन् जमीन फाटल्यासारखी वाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:50 IST

गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या घटनेनंतर जवळपास सात तास ही गाडी कडक उन्हात उभी होती. दूरपर्यंत कुठेही झाडाची सावली नाही. रेल्वेने मदत पुरविण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रवाशांपर्यंत मदत पोहोचू शकली नाही. अशा कठीण परिस्थितीत सात तास घटनास्थळी घालविलेल्या या गाडीतील प्रवाशांनी ‘लोकमत’कडे आपबिती सांगितली.

ठळक मुद्देप्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव : सात तास कडक उन्हामुळे झाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या घटनेनंतर जवळपास सात तास ही गाडी कडक उन्हात उभी होती. दूरपर्यंत कुठेही झाडाची सावली नाही. रेल्वेने मदत पुरविण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रवाशांपर्यंत मदत पोहोचू शकली नाही. अशा कठीण परिस्थितीत सात तास घटनास्थळी घालविलेल्या या गाडीतील प्रवाशांनी ‘लोकमत’कडे आपबिती सांगितली.महिला प्रवाशाला आली भोवळडिंपल शर्मा ही महिला प्रवासी ए २ कोचमध्ये गोरखपूर ते यशवंतपूर असा प्रवास करीत होती. नागपूर रेल्वेस्थानक आल्यानंतर जेंव्हा थर्ड एसी कोचमध्ये तिला हलविण्यात आले तेव्हा तिला अचानक भोवळ आली. काही वेळ रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा दलाने तिला बाजूला आराम करण्यासाठी जागा दिली. त्यानंतर ती शुद्धीवर आली.गाढ झोपेत हाताला जोरदार झटका बसला‘घटना घडली तेव्हा मी आपल्या बर्थवर गाढ झोपेत होते. अचानक कर्कश आवाज झाला आणि हाताला जोरदार झटका बसून जोरात मार लागला. मार लागल्यामुळे वेदना होत होत्या. तेवढ्यात बाजूच्या प्रवाशाला मला दुखापत झाल्याचे समजले. त्यानंतर रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आली. वेळ जसजसा जात होता तशा हाताच्या वेदनाही वाढत होत्या. अशा स्थितीत काही प्रवाशांनी मला औषध दिले तर काहींनी दिलासा दिला. तेवढ्यात रेल्वेतर्फे रुग्णवाहिका आली, परंतु रस्ता खराब असल्यामुळे आणखी वेदना होतील म्हणून रेल्वेनेच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या चमूने घटनास्थळी उपचार केले असता हात फ्रॅक्चर असल्याचे समजले. बँडेज केल्यानंतर बरे वाटत आहे. रेल्वेतर्फेही मदत करण्यात येत आहे.’प्रतिभा श्रीवास्तव, जखमी प्रवासीजमीन फाटल्यासारखे वाटले‘मी गोरखपूरला राहतो. पत्नी आणि मुलीसोबत हैदराबादला जात होतो. गाडीचे चाक तुटले तेव्हा मी गप्पा मारण्यात गुंग होतो. अचानक जोराचा आवाज झाला आणि जमीन फाटल्यासारखे वाटले. खाली पाहिले तर कोचमध्ये मोठी भेग पडली होती. मोठी दुर्घटना घडल्याची शंका आल्यामुळे मी मोठ्याने आवाज केला. दरम्यान गाडी कंपन झाल्यासारखी हलत होती. तेवढ्यात महिला प्रवाशाचा वेदनेमुळे विव्हळण्याचा आवाज आला. मी त्वरित चेन पुलिंग केली. गाडी दोन ते तीन किलोमीटर गेल्यानंतर थांबली.’-विकास सिंग, प्रवासी

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात